ETV Bharat / city

9 ऑक्टोबरपासून धावणार मध्य रेल्वेच्या 5 लांब पल्ल्यांच्या गाड्या - नागपूर - मुंबई दुरंतो सुपरफास्ट

मुंबईतून नवीन पाच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे. यात गोंदिया, नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान विशेष गाड्या 9 ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना ये जा करणे सुकर होणार आहे.

Central Railway
मध्य रेल्वे
author img

By

Published : Oct 7, 2020, 4:51 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने नव्याने पाच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरंतो सुपरफास्ट, सीएसएमटी ते पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान विशेष गाड्या 9 ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना ये जा करणे सुकर होणार आहे.

सीएसएमटी-पुणे, सुरत एक्स्प्रेस सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (गाडी क्रमांक ०२१२३), पुणे-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१२४), सीएसएमटी-पुणे (०२०१५), पुणे-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२०१६), सीएसएमटी-सुरत (गाडी क्रमांक ०२११५), सुरत- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२११६) या सुपर फास्ट गाड्या ९ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२२८९) ही १०ऑक्टोबर, तर नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्रमांक ०२२९०) दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी ९ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. सीएसएमटी-गोंदिया (गाडी क्रमांक ०२१०५) ही ट्रेन ९ ऑक्टोबर, तर गोंदिया-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी १० ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.