ETV Bharat / city

Central Railway : भारतीय रेल्वेमध्ये पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचा पहिला नंबर - महसूल मिळविण्यामध्ये मध्य रेल्वेने बाजी मारली

भारतीय रेल्वेचा पार्सल वाहतुकीतून सर्वाधिक महसूल मिळविण्यामध्ये मध्य रेल्वेने बाजी मारली आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी-२०२२ या महिन्यात पार्सल वाहतुकीतून २८.१६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहेत. एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने पार्सल वाहतुकीतून २८८ कोटी मिळवले जे मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या १३१.३४ कोटींच्या महसुलापेक्षा ११९ टक्के अधिक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ( Central Railway ) सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये पार्सल महसूलात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 2, 2022, 9:28 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वेचा पार्सल वाहतुकीतून सर्वाधिक महसूल मिळविण्यामध्ये मध्य रेल्वेने बाजी मारली आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी-२०२२ या महिन्यात पार्सल वाहतुकीतून २८.१६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहेत. एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने पार्सल वाहतुकीतून २८८ कोटी मिळवले जे मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या १३१.३४ कोटींच्या महसुलापेक्षा ११९ टक्के अधिक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ( Central Railway ) सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये पार्सल महसूलात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.

नॉन-फेअर महसूलात मारली बाजी - रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल वाहतुकीतील वाढ मुख्यत्वे किसान रेलच्या ( Kisan Rail ) यशस्वीपणे चालवण्यामुळे झाली आहे. ज्यामुळे या भागातील नाशवंत वाहतूक देशाच्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचते. आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये (एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२), किसान रेलने विविध गंतव्यस्थानांवर ८४७ फेऱ्या केल्या आहेत. ज्यातून ३.०६ लाख टन वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १ हजार ७४ फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत. ज्यातून ३.७८ लाख टन वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वे सर्व भारतीय रेल्वेत गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. एप्रिल २०२१ - फेब्रुवारी २०२२ दरम्यान या गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामधील महसूल २६.९२ कोटी आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळवलेल्या महसुलापेक्षा १५१ टक्के अधिक आहे.

६ गाड्यांसाठी कंत्राट - मुंबई, नागपूर आणि पुणे विभागाने 'हायब्रीड ओबीएचएस कॉन्ट्रॅक्ट्स ऑन अर्निंग मोड्स' अंतर्गत ६ गाड्यांसाठी कंत्राट दिले आहे. या योजनेअंतर्गत बाह्य आणि अंतर्गत जाहिराती, डिस्पोजेबल लिनेनसह बहुउद्देशीय वस्तूंचे ट्रेनमधील वेंडिंग आणि प्रमोशनल अधिकाराची परवानगी परवानाधारकांना आहे. यामुळे ओबीएचएस आणि बेडरोल सेवांतील खर्चात बचत होईल. यासाठी ४०.५ लाख एक वर्षासाठी परवाना शुल्कासह कंत्राट दिले आहे. या सहा गाड्यांमध्ये मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस, मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि पुणे-अहमदाबाद दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - BMC Budget 2022 : भाजपाचा सत्ताधाऱ्यांना दणका, स्थायी समितीतील 650 कोटींचा फेरफार रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.