मुंबई - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन वाजता केला. हा कार्यक्रम सामाजिक अंतरांचे नियम आणि कोरोना बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून आयोजित केला होता.
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात आपल्या कार्यक्षेत्रात 6.47 लाख झाडे लावली आहेत. आज जागतिक पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज बिल्डिंगला प्रतिकात्मक हरित लाइट्सने प्रकाशित केले. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांत डिजीटल माध्यमांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘जैवविविधता आणि त्याचे महत्त्व’ या विषयावरील एक व्हिडीओ चित्रफित दाखवली.
यावेळी प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता अशोक कुमार गुप्ता, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल, मुंबई विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.