ETV Bharat / city

मध्य रेल्वेची मुंबई विभागात 3 लाख 43 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई - मध्य रेल्वे बातमी

उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकीटावर प्रवास करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकीटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता तिकीट तपासणी मोहिमे दरम्यान प्रामुख्याने लक्षात आल्या.

फुकट्या प्रवाशांवर कारवाई
फुकट्या प्रवाशांवर कारवाई
author img

By

Published : Apr 3, 2021, 8:20 AM IST

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. जून 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 3 लाख 43 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. यातून मध्य रेल्वेने 12 कोटी 29 लाखांचा दंड वसूल केला आहे.

अशी केली रेल्वे कारवाई
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून 2020 ते मार्च 2021 पर्यंत उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीची मोहीम राबवली. या तपासणी दरम्यान 3 लाख 43 हजार फुकटे प्रवासी आढळून आले. त्यांच्या कडून 12 कोटी 29 लाख रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे 2 कोटी 48 लाख प्रकरणे उपनगरी भागात आढळून आली आहेत. ज्यात दंड म्हणून 6 कोटी 63 लाख वसूल केले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील 95 हजार प्रकरणांमधून 5 कोटी 62 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे प्रवासी
मुंबई विभागात जानेवारी -2021 मध्ये 65,140 फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 90 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. फेब्रुवारी-2021 मधील 79,251 फुकट्या प्रवाशांकडून 2 कोटी 66 लाख रुपये आणि मार्च 2021 मध्ये 62, 873 फुकट्या प्रवाशांकडून 2 कोटी 42 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.

वैध रेल्वे तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकीटावर प्रवास करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकीटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता मोहिमे दरम्यान प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

हेही वाचा- नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल

हेही वाचा - मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनीच केले रूग्णालयातील साहित्य लंपास; जितेंद्र आव्हाडांनी दिला चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.