मुंबई - मुंबईत लोकल प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाकडून धोरण आखण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुंबईत दोन दिवसांचा दौरा आहे. यावेळी आयआरएसडीसी अंतर्गत प्लॅटफॉर्म विकासकामांची पाहणी करणार असल्याचे दानवे म्हणाले. भाजपाचे सर्व नेते, पदाधिकारी यावेळी हजर होते.
देशातील ६८ स्टेशनचा कायापालट -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रेल्वेमध्ये सुधारणा सुरु आहेत. मुंबई सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याणसह देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास करण्याचे केंद्राचे नियोजन आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकलवर केंद्राने विशेष लक्ष वेढले आहे. वाहनतळाच्या धर्तीवर मुंबईतील रेल्वे स्थानके उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच लोकलमधील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचे मंत्री दानवे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त सुविधा मुंबईकरांना कशा उपलब्ध होतील, याचा प्राधान्याने विचार करणार येईल. रेल्वे मार्फत सुमारे ५० हजार कोंटीचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मुंबई लोकलने प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. अनेकांनी तक्रारी मांडल्या. मुंबई लोकलच्या गर्दीच्या नियोजनासंदर्भात लवकरच महत्त्वाची बैठक घेणार आहे. मुंबई रेल्वेच्या कारभारासंदर्भातही यावेळी चर्चा करणार आहे, असे मंत्री दानवे यांनी सांगितले.
हे ही वाचा - नवीनच गोष्ट...माझ्याही ज्ञानात भर पडली, शरद पवारांचा मोहन भागवत यांना खोचक टोला
मोदी एक्सप्रेसला हिरवा कंदिल -
दादर स्थानकातून सुटणाऱ्या मोदी एक्सप्रेसला आज मंत्री दानवे यांनी हिरवा कंदील दाखवला. दादर स्थानकावर पोहोचण्यासाठी त्यांनी सीएसएमटी ते दादर असा मुंबई लोकलने प्रवास केला. दादर स्थानकावरुन ही ट्रेन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी बाप्पाची आरती म्हणत या प्रवासाला सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले. मंत्री दानवे यांनी देशातील महिला वर्ग कार्यरत असलेल्या माटुंगा रेल्वे स्टेशनला भेट दिली.
हे ही वाचा - बेळगावात एकीकरण समितीतीत फाटाफूट करून भाजपा सत्तेत - संजय राऊत
मंदिरावरून शिवसेनेला चिमटा -
तिसरी लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. ही लाट येऊ नये, यासाठी आमचेही प्रयत्न सुरु आहेत. काही जण जाणीवपूर्वक मंदिरे बंद ठेवत आहेत. मंदिरात गर्दी झाल्यामुळे कोरोना होत नसल्याचे सांगत दानवे यांनी शिवसेनेला चिमटा काढला.