मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचून नागरिकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. इथल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे पालिकेच्या या प्रयत्नांना यश येत नाही, असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंतीही खासदार शेवाळे यांनी केली आहे.
पावसाळ्यात मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचल्यास केंद्र सरकार जबाबदार - राहुल शेवाळे - मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचून नागरिकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. इथल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे पालिकेच्या या प्रयत्नांना यश येत नाही, असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
![पावसाळ्यात मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचल्यास केंद्र सरकार जबाबदार - राहुल शेवाळे mp Rahul Shewale](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11644036-334-11644036-1620161287183.jpg?imwidth=3840)
mp Rahul Shewale
मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचून नागरिकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. इथल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे पालिकेच्या या प्रयत्नांना यश येत नाही, असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंतीही खासदार शेवाळे यांनी केली आहे.
खासदार राहुल शेवाळे
येत्या काही दिवसांत केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर पालिकेचा हा प्रकल्प रखडेल आणि त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात पुन्हा एकदा हिंदमाता येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचेल. मुंबई महानगरपालिकेला अपेक्षित असलेल्या परवानग्या केंद्र सरकारने लवकरात लवकर दिल्या नाहीत, तर पावसाळ्यात हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्यासाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार असेल, असे शेवाळे यांनी म्हटले.

Last Updated : May 5, 2021, 2:28 AM IST