ETV Bharat / city

'केंद्राने रेमडेसिवीर वाटपाचे नियमन स्वत:कडे घेतले, राज्याला इंजेक्शनचा कमी पुरवठा होणार'

author img

By

Published : Apr 22, 2021, 4:48 PM IST

महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत आपल्याला 2 लाख 68 हजार रेमडीसिवीर मिळणार आहे. त्यामुळे राज्याला दर दिवसासाठी 26 हजार मिळणार आहेत. तर प्रत्येक दिवसासाठी 60 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा राज्यात मोठा तुटवडा होणार आहे.

Rajendra Shingne
राजेंद्र शिंगणे

मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना केंद्र व राज्य सरकारमधील मतभेद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्र सरकारने रेमडेसिवीर वाटपाचे नियमन करणारे अधिकार स्वत:कडे घेतल्याचे बुधवारी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे राज्याच्या वाट्याला रेमडेसिवीर कमी मिळणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीर द्यावे, अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले, की राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात 10 ते 15 टक्के रुग्णांना रेमडेसिवीर लागत आहेत. त्यानुसार आपली मागणी होती. रेमडीसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आपण होतो. त्याचा पुरवठा वाढवावा हे प्रयत्न होते. काल (बुधवारी) रात्री केंद्राने परिपत्रक काढून हे सगळं रेग्युलेशन स्वतःकडे घेतले. केंद्र आता राज्याने पुरवठा करणार आहे. महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत आपल्याला 2 लाख 68 हजार रेमडीसिवीर मिळणार आहे. त्यामुळे राज्याला दर दिवसासाठी 26 हजार मिळणार आहेत. तर प्रत्येक दिवसासाठी 60 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा राज्यात मोठा तुटवडा होणार आहे.

हेही वाचा-महाराष्ट्राला दिवसाला २६ नव्हे, तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्या - नवाब मलिक

कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीर द्यावे-
केंद्र शासनाने रेमडेसिवीरच्या पुरवठ्याचा पुर्नरविचार केला पाहिजे. त्यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिणार आहोत. कोरोना रुग्ण संख्येनुसार रेमडेसिवीर द्यावे, अशी मागणी करणार आहोत. महाराष्ट्राला दररोज 60 हजार रेमडेसिवीर द्यावे, ही मागणी करणार आहोत. केंद्राला तशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही केंद्राशी बोलत आहेत. महाराष्ट्र 1500 मेट्रिक टनपर्यंत आपल्याला ऑक्सिजन मिळत आहे 2000 मेट्रिक टनची 1 मे पर्यंत मागणी जाणार आहे. केंद्राने राज्याला मदत करावी ही विनंती आहे. केंद्राकडे महाराष्ट्राची परिस्थिती व रुग्ण संख्या याची माहिती दररोज उपलब्ध आहे. केंद्राने राज्यात किती रेमडीसीविर हवे आहे, याची विचारणा केलेली नाही.

हेही वाचा-रेमडेसिवीरसह अत्यावश्यक साहित्याचे खरेदी-वितरण राज्यांकडे द्या; राज ठाकरेंचे मोदींना पत्र

रेमडेसिवीर वाटपाचे अधिकार राज्यांकडे देण्याची राज ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घातली आहे. रेमडेसिवीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

'संपूर्ण देशात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या देशात रुग्णसंख्येने एका दिवसात ३ लाखाचा आकडा गाठला आहे. मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत. मृतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकी राज्यातलीही दृश्यं पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे, राजकारणाची मुळीच नाही. आता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे', असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.