मुंबई - राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवन येथिल आयोजित योग वर्गात सहभागी झाले होते. राज्यपालांनी योग दिनानिमित्त योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योग वर्गात सहभाग घेतला.
![राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_21062021101034_2106f_1624250434_528.jpg)
कोरोना नियमांचे पालन
सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल, तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योग संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.
![योग दिनानिमित्त राज्यपालांनी केली योगासने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12208175_787_12208175_1624254562970.png)
हेही वाचा - कोरोना महामारीत योग आशेचा किरण म्हणून सिद्ध - पंतप्रधान नरेंद्र मोदी