ETV Bharat / city

Ganesh Festival 2022 : गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा; पालिका आयुक्तांचे आवाहन - मार्गदर्शक सुचना

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner in mumbai) डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी गणेशोत्सवा (Ganesh Festival 2022) दरम्यान कुठलीही अनुचित हानी होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सुचना (Guidelines) केल्या. तसेच, यंदाचा श्री गणेशोत्सव हा अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा,(Eco friendly Ganeshotsav) असे आवाहनही त्यांनी केले.

Ganesh Festival 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त
author img

By

Published : Aug 8, 2022, 8:13 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असणारा, 'श्री गणेशोत्सव' (Ganesh Festival 2022) हा गेली दोन वर्षे कोविडच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन साजरा केल्या गेला. या दरम्यान महापालिकेने वेळोवेळी केलेल्या सुचनांना मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यंदा आपण हा उत्सव अधिक उत्साहाने साजरा करणार आहोत. या उत्सावाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांचे (Guidelines) आपण अधिकधिक काटेकोरपणे पालन करावे. आणि यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने (Eco friendly Ganeshotsav) साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner in mumbai) डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

आढावा बैठक : श्री गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आज पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध परिमंडळांचे व खात्यांचे उपआयुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय नौदल, मुंबई पोलीस दल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तीकार संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापालिकेद्वारे आतापर्यंत देण्यात आलेल्या मंडप परवानग्या, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहिती बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली. तसेच कृत्रिम तलावांची आकडेवारी, करण्यात येत असलेले नियोजन, इत्यादीची माहिती देण्यात आली.

आयुक्तांनी दिले हे निर्देश : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन - २०१९ नुसार ठेवावे.
· बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये श्री गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमावा.
· महत्त्वाच्या सर्व विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित करावा.
· श्रीगणेश मूर्ती विसर्जन मार्गांची रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व सदर मार्गांवर खड्डे असल्यास ते योग्यप्रकारे भरुन घ्यावेत.
· मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करावी.
· विसर्जन स्थळी असणा-या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी, आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध करुन घ्यावेत.
· रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने बाजुला कराव्या.
· भरती - ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावावे.
· श्रीगणेश मूर्ती विसर्जनानंतर विसर्जित मूर्तींची छायाचित्रे किंवा व्हिडिओचित्रण कोणीही करु नये, अशा सूचना प्रदर्शित करण्याची विनंती समन्वय समितीतर्फे करण्यात आली. त्यानुसार या प्रकारच्या सूचना प्रदर्शित करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले.
· यंदाचा श्री गणेशोत्सव हा अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.