मुंबई - शेअर ब्रोकरचे दिवसाढवळ्या अपहरण (Share Broker Kidnapping) झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पोलिसांना मिळाले आहे. या प्रकरणी ३ आरोपींना अटक (Three Accused Arrested) करण्यात आली आहे. ही घटना बोरिवली (Borivali) येथे घडली आहे.
- अपहरणाचे सीसीटीव्ही समोर -
गुरुवारी लखानी यांना बोरिवलीमधील भगवती हॉटेलजवळ काही लोकांनी बोलावले होते. त्यानंतर जबरदस्तीने लाल रंगाच्या गाडीत त्यांना बसवून पळ काढला. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ बोरिवली पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले.
- दिलेले पैस परत घेण्यासाठी केले अपहरण -
मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले आणि तासाभरात प्रथम अक्षत नेमीचंद सुराणा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले, त्याच्या चौकशीच्या आधारे लखानीचे लोकेशन तसेच या घटनेत सहभागी असलेले अन्य 3 आरोपी समोर आले. चौकशीत अक्षत हा व्यवसायाने ज्वेलर्स असून, पीडितेने लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते, जे त्याने शेअर मार्केटमध्ये बुडवले होते, आणि ते परत करता आले नव्हते, असे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पैसे परत मिळावेत म्हणून आरोपीने त्याच्या साथीदारांसह पीडितेचे अपहरण केले.