ETV Bharat / city

मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये लागणार ४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे - CCTV cameras in Mumbai municipal school

पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थी पळवून नेण्याच्या तसेच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटना पालिका शाळांमध्ये घडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली जात होती.

CCTV cameras to be set in Mumbai municipal schools
मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:08 AM IST

मुंबई - शाळांमधून विद्यार्थी पळवून नेण्याच्या तसेच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटना पालिका शाळांमध्ये घडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली जात होती. या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे लवकरच पालिका शाळांमध्ये ४ हजार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.

मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे... शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांची माहिती

हेही वाचा... अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

दोन वर्षापूर्वी दादर येथील शाळेत नऊ वर्षांच्या मुलीवर १९ वर्षांच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्याची हत्या झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिक्षण समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. याच मागणीचे पत्र शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनीही तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्षांना दिले होते.

हेही वाचा... विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या

शिक्षण समिती बैठकीत 'वीर भगतसिंग इंटरनॅशनल स्कुल'विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, पालिकेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरवा करुन प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा माजी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी शिक्षण समितीत उपस्थित केला. अशा शाळांना पालिकेची मान्यता मिळते. त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत त्यांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. तसेच आवश्यक सर्व प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सईदा खान यांनी सीसीटीव्हीचे काय झाले, ते कधी लागणार असे प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा.... 'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध

यावर उत्तर देताना शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. पालिका शाळांमध्ये प्रवेशद्वार आणि वर्गाबाहेर सीसीटीव्ही लावले जाणार होते. मात्र, वर्गात काय चालले आहे, शिक्षक वर्गात शिकवतात की नाही, वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ४ थी ते ७ वी पर्यंतच्या सर्व वर्गात सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचे उपायुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समितीत सांगितले. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये लवकरात लवकर सीसीटीव्ही लावावे, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा... डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

इतक्या शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही...

महापालिकेच्या सुमारे ९८१ शाळांमध्ये २ लाख ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या स्वतःच्या ४५८ इमारती असून ६२ खासगी इमारतीत हे वर्ग सुरू आहेत. या शाळांतील चौथी ते सातवीच्या वर्गात, शाळांचे प्रवेश द्वार, वर्गाबाहेरील परिसरात चार हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

Intro:मुंबई - शाळांमधून विद्यार्थी पळवून नेण्याच्या तसेच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटना पालिका शाळांमध्ये घडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली जात होती. या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे लवकरच पालिका शाळांमध्ये ४ हजार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. Body:दोन वर्षापूर्वी दादर येथील शाळेत नऊ वर्षांच्या मुलीवर १९ वर्षांच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्याची हत्या झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिक्षण समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. याच मागणीचे पत्र शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनीही तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्षांना दिले होते.

शिक्षण समिती बैठकीत 'वीर भगतसिंग इंटरनॅशनल स्कुल'विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, पालिकेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरवा करुन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा माजी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी शिक्षण समितीत उपस्थित केला. अशा शाळांना पालिकेची मान्यता मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यींनीच्या सुरक्षेबाबत त्यांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. तसेच आवश्यक सर्व प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सईदा खान यांनी सीसीटीव्हीचे काय झाले, ते कधी लागणार असे प्रश्न उपस्थित केले.

यावर उत्तर देताना शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. पालिका शाळांमध्ये प्रवेश द्वार आणि वर्गाबाहेर सीसीटीव्ही लावले जाणार होते. मात्र वर्गात काय चालले आहे, शिक्षक वर्गात शिकवतात की नाही, वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ४ थी ते ७ वी पर्यतच्या सर्व वर्गात सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचे उपायुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समितीत सांगितले. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये लवकरात लवकर सीसीटीव्ही लावावे असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.

इतक्या शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही -
महापालिकेच्या सुमारे ९८१ शाळांमध्ये २ लाख ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या स्वतःच्या ४५८ इमारती असून ६२ खासगी इमारतीत हे वर्ग सुरू आहेत. या शाळांतील चौथी ते सातवीच्या वर्गात, शाळांचे प्रवेश द्वार, वर्गाबाहेरील परिसरात चार हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.