मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक सीबीएससी मंडळाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी- बारावीची परीक्षा देशभरात 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशासह देशातील अनेक परीक्षा केंद्रांवर दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा ही 20 मार्चपर्यंत चालणार आहे तर बारावीची परीक्षा ही 15 मार्चला सुरू होऊन ती 30 मार्चपर्यंत चालणार आहे. यासाठीची माहिती मंडळाने आपल्या. www.cbse.nic.in या संकेस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा... बाळासाहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेचं कारण....
मागील वर्षाच्या तुलनेत सीबीएससी मंडळाच्या या दोन्ही परीक्षा सुमारे वीस दिवस अगोदर घेतल्या जाणार आहेत. यावेळीही देशासह देशातील अनेक परीक्षा केंद्रांवर दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिवाय या दोन्ही परीक्षा आणि त्याचे पेपर तब्बल दीडशेहून अधिक विषयांमध्ये असणार आहेत.
हेही वाचा... अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार
सीबीएससी मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची सुरुवात मागील वर्षी ५ मार्चला झाली होती. या परीक्षेला देशभरातून १६ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा सीबीएससी मंडळाकडून अद्यापही किती विद्यार्थी परीक्षेला बसतील याची माहिती जाहीर केली नसली तरी हा आकडा साधारण सोळा ते सतरा लाखाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.