मुंबई - येस बँक प्रकरणात आरोपी असलेल्या राणा कपूर आणि रेडियस डेव्हलपर्सचे डायरेक्टर संजय छाब्रिया यांचाशी संबंधित व्यक्तीच्या मुंबई आणि पुणे येथील निवासस्थानावर आज सीबीआयने छापे टाकले ( CBI raids at six places in Mumbai and Pune ) असून तपास सुरू आहे. एकूण 6 ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. त्यामध्ये मुंबई आणि पुण्यात विविध ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. बिल्डर संजय छाब्रियाच्या रेडियस ग्रुपच्या मालमत्तांच्या ठिकाणीही छापेमारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
हेही वाचा - Yes Bank case : सीबीआयची मुंबईसह पुण्यात छापेमारी
डीएचएफएल (DHFL) चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या केसेसमुळे सध्या कारागृहात आहेत. तर, येस बॅंक घोटाळ्यातही राणा कपूर तळोजा कारागृहात आहे. येस बॅंकेचा सहसंस्थापक असलेला राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सीबीआयचा दावा आहे. डीएचएफएल च्या माध्यमातून 3 हजार 700 कोटी रुपयांच्या हाऊसिंग फायनान्स प्रकरणातील हा घोटाळा आहे.
रेडियस ग्रुपने रिअल इस्टेटच्या विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात डीएचएफएलच्या माध्यमातून 3 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. रेडियस आणि समर ग्रुपमध्ये संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पण, या प्रकरणात कर्जाचा वापर हा योग्य गोष्टीसाठी न झाल्याचे आढळले आहे. तर, आणखी एका प्रकरणात ही रक्कम कुटुंबीयांच्या नावे वळवण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात निदर्शनास आले आहे.
हेही वाचा - Shivsena Press : 'झुकेंगे नही' शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी; पत्रकार परिषदेसाठी LED स्क्रीनची व्यवस्था