मुंबई - सरकारी बँकांची फसवणूक होण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सीबीआयने मुंबईस्थित दोन खासगी कंपन्या व अन्य आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बँक ऑफ इंडिया बँकेने फसवणूक झाल्याची सीबीआयकडे तक्रार केली होती. यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबईस्थित दोन खासगी कंपन्या, खासगी कंपनीचे संचालक आणि इतर अज्ञात सरकारी बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाखांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
काय आहे फसवणुकीचे प्रकरण?
वर्ष 2013 ते 2018 या काळात मुंबईतील खासगी ओव्हरसीज कंपनीचे एमडी आणि अज्ञात कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये फोर्टमधील कॉर्पोरेट शाखा असलेल्या बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याचा हेतू असल्याचा दावा करण्यात येत आहे आहे. आरोपींनी एफबी खरेदी / विदेशी बिले वादाची मर्यादा आणि निर्यात पॅकेजिंग क्रेडिट मर्यादा मिळविण्याबाबत षड्यंत्र रचून खासगी कंपनीला 60 कोटी रुपयांच्या (अंदाजे) सुविधा मंजूर करून घेतल्या. मात्र, सुविधेचा लाभ घेतल्यानंतर कंपनीने हा निधी इतरत्र वळविला. तरीही कंपनीने दाव्याच्या समर्थनार्थ बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामध्ये बँक ऑफ इंडियाचे सुमारे 57.26 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
खासगी कंपनीसह आरोपींच्या निवासी आणि अधिकृत जागेवर मुंबईत पाच ठिकाणी शोध घेण्यात आला. मालमत्ता, कर्ज, बँक खात्याचे तपशील आणि लॉकर की यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.