ETV Bharat / city

सीबीआय न्यायालयाचा दणका: राणा कपूरच्या पत्नीसह दोन मुलींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - बिंदू कपूर

येस बँकेचा सहसंस्थापक राणा कपूरनंतर त्याचे कुटुंबदेखील अडचणीत सापडले आहे. सीबीआय न्यायालयाने कपूर कुटुंबाच्यावतीने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे कपूरची पत्नी बिंदू, मुलगी राधा खन्ना आणि रोशना यांना तुरुंगात जावे लागणार आहे.

राणा कपूर
राणा कपूर
author img

By

Published : Sep 20, 2021, 4:31 PM IST

मुंबई- येस बँक घोटाळा प्रकरणी येस बँकेचा सहसंस्थापक राणा कपूरची पत्नी व मुलींना सीबीआय न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि मुलगी राधा खन्ना आणि रोशनी यांना आरोपी बनवण्यात आले आहे. या आरोपपत्राची दखल घेत सीबीआय न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राणा कपूर यांची पत्नी व मुलींना जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने जामीनाचा अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा-दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

१४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी -

मिळालेल्या माहितीनुसार, येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशी समोर आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि मुली राधा खन्ना आणि रोशनी यांना आरोपी बनविण्यात आले आहे. आरोपपत्राची दखल घेत सीबीआय न्यायालयाने या तिघांनाही समन्स बजावले होते. मात्र, या तिघीही आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी हजर राहिल्या होत्या. त्यांचे वकील विजय अग्रवाल आणि राहुल अग्रवाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने राणा कपूर यांची पत्नी व मुलींना जामीन देण्यास विशेष न्यायालयाने शनिवारी नकार देत त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली.

हेही वाचा-गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 9,000 कोटींचे हेरॉइन जप्त, गुप्तचर विभागाची सर्वात मोठी कारवाई

काय म्हणाले न्यायालय -

राणा कपूर यांची पत्नी बिंदू, मुली राधा आणि रोशनी यांच्या बेकायदा कृतीमुळे बँकेला चार हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना महिला आणि लहान मुलांची आई असल्याने सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. येस बँक आणि डीएचएफएलचे अनेक ठेवीदार आणि भागधारकांची फसवणूक झाली. त्यामुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेला गंभीर फटका बसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

हेही वाचा-दिव्यांगांकरिता घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

२३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी -

आरोपींचे वकील विजय अग्रवाल आणि राहुल अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, बिंदू, राधा आणि रोशनीला अटक न करता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना जामिनाचा अधिकार आहे. न्यायालयाने आपल्या अशिलाला बोलावून घेण्यासाठी विशेषाधिकार वापरला होता. त्यामुळे त्यांच्या अटकेची गरज नव्हती, हे स्पष्ट झाले. मात्र, विशेष न्यायाधीश एस. यू. वाडेगावकर यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण
येस बँकेकडून तब्बल 3700 कोटी रुपयांचा शॉर्ट-टर्म डिबेंचर हे डीएचएफएलमध्ये एप्रिल 2018 मध्ये गुंतवण्यात आले होते. यासाठी वाधवान बंधूंकडून बँकेचे प्रमुख राणा कपूर याला 600 कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून देण्यात आल्याचे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. यानंतर येस बँक डबघाईला आल्यामुळे आर्थिक संकटात सापडली होती. दिवाण हाऊसिंग फायनान्सचे प्रमुख कपिल वाधवान, धीरज वाधवान हेदेखील अटकेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.