ETV Bharat / city

Sachin Vaze : माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला न्यायालयाने घातल्या 'या' अटी

author img

By

Published : Jun 3, 2022, 5:21 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुली प्रकरणात निलंबीत पोलीस अधिकार सचिन वाझेल माफीचा साक्षीदार झाला आहे. माफीचा साक्षिदार होण्यासाठी निलंबित सचिन वाझेला न्यायालयाने अटी घातल्या ( CBI court conditions for sachin vaze prosecution witness ) आहेत.

Sachin Vaze
Sachin Vaze

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुली प्रकरणात निलंबीत पोलीस अधिकार सचिन वाझेल माफीचा साक्षीदार झाला आहे. माफीचा साक्षिदार होण्यासाठी निलंबित सचिन वाझेने सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मुंबईत सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने मंजूर केला. याबाबतचा सविस्तर आदेश आज ( 3 मे ) सार्वजनिक करण्यात आला आहे. अर्जदार सचिन वाझेला अटींच्या अधीन राहून माफीचा साक्षीदार बनवण्यास न्यायालयाने परवानगी दिली ( CBI court conditions for sachin vaze prosecution witness ) आहे.

  • गुन्ह्याशी संबंधित त्याच्या माहितीत असलेल्या संपूर्ण परिस्थितीचा संपूर्ण आणि खरा खुलासा केला पाहिजे.
  • त्याने अशा सर्व तथ्यांचा खुलासा केला पाहिजे, जी त्याने आधीच मान्य केले होते. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली पाहिजे जी संपूर्ण गुन्हेगारी कट उलगडण्यासाठी आणि त्याच्या आणि इतरांनी केलेल्या इतर गुन्ह्यांचा उलगडा होईल.

न्यायाधीशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्जदार/आरोपी सचिन वाझेला वरील सर्व अटी वाचून समजावून सांगितल्या आहेत. त्यावर सचिन वाझेने म्हटले की, त्याला सर्व अटी समजल्या आहेत आणि त्याला माफी दिल्यास सर्व अटींचे तो पालन करेल. हे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा माफिचा साक्षीदार अर्ज मंजूर करण्याचा आदेश काढला आहे. सचिन हिंदुराव वाझे यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 306 अन्वये माफी देण्यात आली आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्ष त्याला साक्षीदार म्हणून तपासू शकतो.

आरोपी सचिन वाझे स्वेच्छेने या प्रकरणाशी संबंधित विविध आक्षेपार्ह तथ्ये उघड केली आहेत. वाझेच्या कबुलीजवाबात त्याने अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या इतर आरोपींचा ऑर्केस्ट्रा, बार आणि इतर आस्थापनांकडून लाच बेकायदेशीर कृत्ये वसूल करण्याबाबतचा गुन्हेगारी सहभाग उघड केला आहे. सचिन वाझेने त्याच्या सेवेत पुनर्स्थापनेशी संबंधित तथ्ये देखील उघड केली आहेत. सचिन वाझेचा कबुलीजवाब सीलबंद पाकिटात न्यायालयासमोर आहे.

हेही वाचा - Nana Patole : "गांधी परिवाराला हात लावाल तर..."; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.