मुंबई- काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई पालकमंत्री असलम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी स्टेजवर तलवार हाती घेतली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केल्यानंतर आज बांद्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाची 26 मार्च रोजी बांद्रा येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री मंत्री असलम शेख ( Guardian Minister Aslam Sheikh ) , शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी ( Imran Pratapgadi ) यांनी मंचावर हातात खऱ्या तलवारी घेऊन दाखविल्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मोहित कंबोज भारतीय ( BJP leader Mohit Kamboj ) यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर आज मुंबई पोलिसांनी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर आर्म्स एक्ट व इतर कायद्या अंतर्गत बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा-House For MLA : 'आमदारांच्या घरासाठी कुठलाही प्रस्ताव किंवा कोणत्याही आमदाराची मागणी नाही'
कंबोज भारतीय यांनी मुंबई पोलिसांना दिले आव्हान-
सार्वजनिक ठिकाणी खुली तलवार दाखवल्यामुळे 23 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड, मंत्री असलम शेख आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडून अशाप्रकारे खऱ्या तलवारी दाखवून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता कायदा सुव्यवस्था राखताना भेदभाव केला जात नाही, असे दाखवून द्यावे असे आव्हान मोहित कंबोज भारतीय यांनी मुंबई पोलिसांना दिले होते.
हेही वाचा-विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
पंतप्रधानांनीही दाखविल्या होत्या तलवारी-
बांद्रा येथे झालेला कार्यक्रम शीख समुदाय देखील उपस्थित होते. या शीख समाजातील लोकांनी आपल्याला या तलवारी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली ( Aslam Shaikh On Mohit Kamboj ) आहे. अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कार्यक्रमादरम्यान अशा तलवारी दाखवले असल्याची आठवण असलम शेख यांनी मोहित कंबोज यांना करून दिली. दादर येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना असलम शेख यांनी हे स्पष्टीकरण दिले होते.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) अटक केली ( Nawab Malik Arrested ) होती. त्या दिवशी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी तलवार काढून जल्लोष केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.