ETV Bharat / city

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे कोण आहेत? वाचा कारकीर्द - ज्येष्ठ वकील हरीश साळवे नेमकं कोण

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. एकनाथ शिंदे गटाने 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आह़े. या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे त्यामुळे या इकडे सर्व महाराष्ट्राचा देशाचे लक्ष लागले आहे एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे बाजू मांडणार आहे.

career of senior advocate Harish Salve  In Marathi

author img

By

Published : Jun 27, 2022, 10:38 AM IST

Updated : Jun 27, 2022, 11:40 AM IST

मुंबई - महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. एकनाथ शिंदे गटाने 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आह़े. या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे त्यामुळे या इकडे सर्व महाराष्ट्राचा देशाचे लक्ष लागले आहे एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे बाजू मांडणार आहे.

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यावर कधी सलमान खानचे वकील म्हणून त्यांच्यावर टीका झाली तर कधी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी फक्त एक रुपया मानधन घेतलं म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होतो. त्यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. विदर्भवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे.

सीएचं शिक्षण घेणारे हरिश साळवे - हरीश साळवे यांचं मूळगाव नागपूर. दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे ते पुत्र. त्यांनी आधी सीएचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते वकिली व्यवसायात दाखल झाले. त्यांना लहानपणापासून इंजिनिअर व्हायची इच्छा होती. मात्र महाविद्यालयात दाखल होईपर्यंत त्यांचं लक्ष सीए होण्याकडे गेलं. सीएच्या परीक्षेत ते दोनदा नापास झाले. प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी वकिलीचं शिक्षण सुरू ठेवलं.

ब्रिटनच्या महाराणीचे वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल पदी नियुक्ती - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने 13 जानेवारी 2020 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. बॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव आहे.

पहिला खटला दिलीप कुमार यांचा - हरीश साळवे यांच्या कारकीर्दीची सुरुवात 1975 साली दिलीप कुमार यांच्या खटल्यासह झाली. हरीश या खटल्यात त्यांच्या वडिलांना मदत करत होते. दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा बाळगल्याचा आरोप झाला होता. आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्यांना कर आणि दंड दोन्ही भरावा लागला होता. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं.

अंबानी, महिंद्रा आणि टाटांचे वकील - 1992 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी टाटा, महिंद्रा आणि अंबानी यांसारख्या मोठ्या घराण्यांची वकिली केली. केजी बेसिन प्रकरणात जेव्हा अंबानी बंधुंमध्ये वितुष्ट निर्माण झालं तेव्हा मुकेश अंबानी यांचा पक्ष हरीश साळवे यांनी मांडला. भोपाळ वायुगळती प्रकरणात युनियन कार्बाईड प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा केशव महिंद्रा यांच्यातर्फे त्यांनी युक्तिवाद केला. नीरा राडिया प्रकरणात खासगी पणाच्या अधिकाराचा मुद्दा घेऊन सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा त्यांची बाजू साळवे यांनी मांडली.

व्होडाफोन खटल्यामुळे आले नावारुपाला - व्होडाफोनने 14200 कोटी रुपयांचा कर कथितरित्या चुकवल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यात साळवेंनी व्होडाफोनला विजय मिळवून दिला होता. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला होता. भारतीय कर प्रशासनाला परदेशात झालेल्या व्यवहारावर कर आकारण्याचा अधिकार नाही. त्यावेळी नानी पालखीवाला यांचा फोटो समोर ठेवायचो अशी आठवण ते सांगतात.

इटलीच्या सैनिकांची बाजू - केरळमध्ये दोन मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी साळवेंनी इटलीच्या दुतावासाची बाजू मांडली होती. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. मात्र जेव्हा इटली सरकारने या मच्छीमांरांना भारताकडे सोपवण्यास नकार दिला तेव्हा साळवेंनी या खटल्यातून फारकत घेतली. बिल्किस बानो खटल्यातील त्यांचा विजय हाही उल्लेखनीय समजला जातो.

गुजरात दंगलीच्या वेळी भेदभावाचा आरोप - गुजरात दंगलीच्या खटल्याच्या वेळी सुप्रिम कोर्टाने त्यांची नियुक्ती अॅमिकस क्युरी म्हणून केली होती. ही व्यक्ती जनहिताच्या प्रकरणी कोर्टाची मदत करते. मात्र काही दंगलग्रस्तांनी साळवेंवर पक्षपाताचा आरोप लावला. साळवे काही पोलिसांना वाचवत आहे असा आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साळवेंवर केला होता. सुप्रिम कोर्टाने या आरोपांचं खंडन केलं होतं.

सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती - 1999 साली रालोआ सरकारच्या कार्यकाळात त्यांची भारताचे सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झाली. तेव्हा ते 43 वर्षांचे होते. 2002 पर्यंत ते या पदावरती होते.

हेही वाचा - Shivsenas rebel of MLAs petition : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेची लढाई सर्वोच्च न्यायालयात, दोन दिग्गज वकील मांडणार बाजू

Last Updated : Jun 27, 2022, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.