ETV Bharat / city

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा - नितेश राणे - special session on womens security

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

nitesh rane
नितेश राणे
author img

By

Published : Sep 11, 2021, 6:48 PM IST

मुंबई - साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली.

हेही वाचा - Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  • दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा - नितेश राणे

पुणे, मुंबईमध्ये महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. सरकारमधले मंत्रीच महिलांवर अत्याचार करून राजरोसपणे फिरत असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे. दिशा सालियन, पूजा चव्हाण, करुणा मुंडे ही सर्व प्रकरणे जनतेसमोर आहेत. या प्रकरणांमध्ये सत्तेवर असलेले मंत्रीच महिलांवर अत्याचार करत आहेत. मग गुन्हेगारांना कोण थांबवणार? असा सवाल नितेश राणे यांनी राज्य सरकारला केला आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

  • 'त्या' पीडितेचा मृत्यू -

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, यात राजकारण करू नये - निलम गोऱ्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.