मुंबई - पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
- कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.
- अटकेला राज कुंद्रा यांचे हायकोर्टात आव्हान -
पोर्नोग्राफी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी आता अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील आरोपांशी संबंधित व्हिडिओ हे 'कामुक' म्हणून गणले जाऊ शकतात. मात्र, त्यातून कोणतेही 'स्पष्ट लैंगिक कृत्य' दाखवले जात नाही, असा युक्तिवाद कुंद्रा यांनी याचिकेत केला आहे.
- शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचे पथक -
पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली. दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही धैर्याने सामना करेल.
- शिल्पा शेट्टीचा 'हंगामा २' चित्रपट आज प्रदर्शित -
मागच्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा 'हंगामा २' या चित्रपटातून कमबॅक करत आहे. शिल्पा शेट्टीचा 'हंगामा २' हा चित्रपट आज(23 जुलै) ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला आहे.