ETV Bharat / city

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार - mumbai marathi news

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तिघे जण मुंबईच्या दिशेने जात होते. दरम्यान त्यांच्या कारला अचानक आग लागली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच कार चालक असलेले फिरोज सोलंकी यांनी व कारमधील दोघांनी कारबाहेर पळ काढला.

बर्निंग कार
बर्निंग कार
author img

By

Published : Dec 18, 2020, 4:02 PM IST

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा फरार पहायला मिळाला. हलोली- बोट येथे या कारने अचानक पेट घेतली. अचानक लागलेल्या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

बर्निंग कारचा थरार

अशी घडली घटना-

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील हालोली- बोट परिसरात ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तिघे जण मुंबईच्या दिशेने जात होते. दरम्यान त्यांच्या कारला अचानक आग लागली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच कार चालक असलेले फिरोज सोलंकी यांनी व कारमधील दोघांनी कारबाहेर पळ काढला. क्षणार्धात कारला लागलेल्या आगीने मोठा भडका घेतला व या भडक्यात कार जळून राख झाली.

शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती-

कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ही घटना वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी जळलेली कार महामार्गावरुन बाजूला सारून वाहतूक सुरूळीत केली.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात-

मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विरार हद्दीतील सकवार परिसरात मुंबई लेनवर पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात घडला. जखमी व मयत हे डोंबिवली परिसरातील राहणारे आहेत.

हेही वाचा- बीड: प्लायवूडच्या गोदामात स्फोट; एक ठार, दोन जखमी

हेही वाचा- मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा; आता 'या' प्रवाशांना प्रवासाची मुभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.