मुंबई - बुली बाई अॅप प्रकरणी तीन आरोपींना मुंबई पोलिसांच्या सायबर आतापर्यंत ( Bulli Bai App Three Arrested ) अटक केली आहे. यातील उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज शुक्रवार (दि.14) रोजी बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली ( Bandra Court Judicial Custody ) आहे. याप्रकरणातील महिला आरोपी श्वेता सिंगच्या वकिलांनी तिला पोलिसांनी थापड मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर न्यायालयाने डीसीपी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
आरोपींनी दाखल केले जामीन अर्ज
तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 3 जानेवारी रोजी बेंगलोर येथून अटक करण्यात आलेला आरोपी विशाल कुमार झा याने जामीनासाठी अर्ज केला होता. तर आज श्वेता सिंग आणि मयंक रावल या दोन्ही आरोपींना जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दोघांना कोरोनाची लागण
बांद्रा कोर्टाने तिनही आरोपींना न्यायिक कोठडी सुनावली आहे. तरी यातील आरोपी विशाल कुमार झा याला 10 जानेवारी रोजी, तर दुसरा आरोपी मयंक रावल याला 13 जानेवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. तर महिला आरोपी श्वेता सिंगला कलिनातील कोविड सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. विलगीकरण कक्षाची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.
विशाल कुमार आणि मयंक रावलची होणार आर्थर रोड मध्ये रवानगी
विशाल कुमार आणि मयंक रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवले जाणार आहे. आर्थर रोड जेल हे मुंबईतील सर्वात मोठे जेल आहे. त्यामध्ये आतापर्यंत अंडरवर्ल्ड डॉन पासून तर राजकीय नेत्यांना ठेवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण ?
बुली बाई अॅप वरुन मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केले जात होते. ज्यावेळी ह्या अॅपची माहिती समोर आली तेव्हा मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅपवर आतापर्यंत 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. तसेच, त्यांची बोलीही लावली जात होती. याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - Wardha Illegal Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता