ETV Bharat / city

BMC Bulldozer Action : मुंबईत ठाकरे सरकारचा बुलडोजर पॅटर्न; 'या' व्यक्तींवर कारवाई!

शिवसेनेवर ( Shiv Sena ) टीका करणारी अभिनेत्री कंगणा रणौतच्या ( Actress Kangana Ranaut ) कार्यालयावर देखील मुंबई महापालिकेचा बुलडोजर ( Municipal bulldozer Action ) चाललेला होता. कंगणा, राणे, मोहित कंबोज यांच्यानंतर आता राणा ( Narayan Rane Mohit Kamboj Navneet Rana Sonu Sood BMC Bulldozer Action ) दांपत्यही पालिकेच्या रडारवर आहेत. रवी राणा यांच्या खारमधील इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली आहे.

author img

By

Published : May 6, 2022, 10:19 PM IST

Updated : May 7, 2022, 1:25 PM IST

BMC Bulldozer Action
BMC Bulldozer Action

मुंबई - महाविकास आघाडी सरकारशी पंगा घेणारे नेते मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. याचे कारण म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आदेश बंगला आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या घराला मुंबई पालिकेने अवैध बांधकामांचा कारण देत नोटीस बजावली होती. शिवसेनेवर ( Shiv Sena ) टीका करणारी अभिनेत्री कंगणा रणौतच्या ( Actress Kangana Ranaut ) कार्यालयावर देखील मुंबई महापालिकेचा बुलडोजर ( Municipal bulldozer Action ) चाललेला होता. कंगणा, राणे, मोहित कंबोज यांच्यानंतर आता राणा ( Narayan Rane Mohit Kamboj Navneet Rana Sonu Sood BMC Bulldozer Action ) दांपत्यही पालिकेच्या रडारवर आहेत. रवी राणा यांच्या खारमधील इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय

केंद्र सरकारच्या आंतरिक असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबीचा वापर करत राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या या प्रमुख एजन्सी मार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईला तोंड देण्याकरिता राज्य सरकार विरोधात जे कोणी बोलत असणार त्याविरोधात राज्य सरकारचे मुंबई पोलीस किंवा मुंबई महानगरपालिकेच्याकडून कारवाई करण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एकंदरीत आतापर्यंत राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या कोणकोणत्या नेत्यांविरोधात महापालिकेने नोटीस बजावली आहे. याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

अभिनेत्री कंगना रणौत प्रकरण : अभिनेत्री कंगना रणौत आणि राज्य सरकारमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या वादानंतर कंगना विरोधात मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत कार्यालय संदर्भात नोटीस पाठवण्यात आले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून कंगनाचे कार्यालय बुलडोझरने तोडण्यात आले होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेने तिचे ऑफिसचे बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून 2 कोटी रुपयांचे नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. कंगनाने महापालिकेने केलेल्या कारवाईमध्ये कार्यालयांमधील 40% मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयात कंगनाने महापालिके विरोधात याचिका दाखल केलेली आहे. मात्र अद्याप त्यावर कुठलाही निर्णय आलेला नाही आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरावरील कारवाई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यामध्ये अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना जनआशीर्वाद यात्रा दरम्यान अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे पुन्हा सातत्याने नाव घेत असल्याने त्यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यावरील कारवाई संदर्भात महापालिकेने नोटीस बजावली होती. महापालिकेने नोटीस वाटले होते की सीआरझेड नियमाचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे राणे यांच्या बंगल्याचे तपास केला गेला होता तसेच या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. पण यातील बांधकाम पंधरा दिवसात पाठवण्यास सांगितले होते. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नोटीस नुसार राणेंना नोटीस जारी झाल्यापासून 15 दिवसाच्या आत हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राणे यांना देण्यात आलेले महापालिकेला नोटीस वरून मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत महापालिकेला कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर राणे यांच्या विरोधातील कारवाई थांबविण्यात आली होती.

भाजपा नेते मोहित कंबोज : भाजपा नेते मोहित कंबोज यांना मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. कंबोज यांनी महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या कंबोज यांच्याविरोधात मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी घराची पाहणी करण्याकरिता पथक पाठविण्यात आले होते. घराची पाहणी करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावण्यात तर मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडी विरोधात सोशल मीडियावर ट्विट करत झुकणार नाही, असेल म्हटले होते.

राणा दाम्पत्यांना मुंबई महापालिकेची नोटीस : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवास समोर हनुमान चालीसा पठण करणार असे वक्तव्य राणा दांपत्य यांनी केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष देखी निर्माण झाला होता. या संघर्षामध्ये राणा दांपत्य यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून राणा दाम्पत्यांना खारमधील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केले असल्याचे नोटीस खार येथील फ्लॅटवर लावण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे पथक राणा दांपत्य यांच्या घराची पाहणी करण्याकरिता खार येथील निवासस्थानी गेले देखील होते. मात्र घरी कोणी नसल्याने परत निघून आले होते. मात्र पोलिसांनी अटक केल्यामुळे तब्बल 13 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले राणा दांपत्य हे गुरुवारी जेलमधून बाहेर आले आहे. पुन्हा राणा यांच्या खार येथील निवासस्थानी जाऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने पाठवण्यात आलेल्या नोटीस विरोधात रवी राणा काय उत्तर देतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अभिनेता सोनू सूद महापालिकेची कारवाई : कोरोना काळामध्ये मुंबईतील अनेक चाकरमान्यांना सोनू सूद यांनी स्वतःच्या स्वखर्चाने त्यांच्या गावी पाठवण्यात त्यांना मदत केली होती. त्यानंतर सोनू सूद हे भाजपामध्ये प्रवेश करून पंजाबमध्ये निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर सोनू सूद यांच्या जुहू येथील निवासी इमारतीत कुठलीही परवानगीशिवा हॉटेल सुरू केल्याची तक्रार महापालिकेने जुहू पोलिसांकडे केली होती. तसेच पोलीस कारवाईची मागणी केली होती. सोनू सूद यांनी इमारतीच्या रूपांतर हॉटेलमध्ये केले आहे. त्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही. त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे महापालिकेने म्हटले होते. सोनू सूदला याप्रकरणी पाठवलेल्या नोटीसची दखल सोनू सूदने घेतली नसल्याचे महापालिकेने तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणा विरोधात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सोनू सूदला तीन आठवड्याचा अंतरिम दिलासा उच्च न्यायालयाने दिला होता.

'आम्ही भाजपाचे अनुकरण करत नाही' : ठाकरे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात भाजपाकडून करण्यात येणाऱ्या कुरघोडीचे राजकारण आम्हाला करता येत नाही. राज्यात गेल्या दोन वर्षात केंद्रीय तपास यंत्रणेने ज्याप्रमाणे धुमाकूळ घातला आहे. मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येणारी कारवाई हे वर्ष नववर्ष सुरू आहे. अनेक प्रकरण जुने असतात त्या त्या प्रकारे महापालिकेतील त्या विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र महानगरपालिके मार्फत होणारे कारवाईही सुडाचे असल्याचे बोलणे हे नितांत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार तथा प्रवक्ते मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाची परीक्षा ऑफलाईन, 15 मिनिटे वेळ वाढून मिळणार, कुलगुरूंची माहिती

Last Updated : May 7, 2022, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.