मुंबई - मुंबईतील कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड वरील एका खासगी इमारतीचा काही भाग मध्यरात्री ( Mumbai Building Collapsed ) कोसळला. अग्निशमन दलाने १२ जणांना बाहेर काढले असून, 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात ( Many people were trapped under pile ) आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत १२ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले : महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चारही इमारतींना बीएमसीने नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. सर्व लोकांना बाहेर काढणे हे पहिले प्राधान्य आहे. मंगळवारी सकाळी मिळून लोकांना बाहेर काढले जाईल आणि उर्वरित इमारत पाडण्यात येईल. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.
१२ जण सुखरूप : कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग रात्री 11.50 च्या सुमारास कोसळला. या इमारतीचा भाग दुसऱ्या इमारतीवर पडला आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्या खाली 25 ते 25 लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 फायर इंजिन तसेच 2 रेस्क्यू वाहने घटनास्थळी दाखल झाले असून, १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
-
#KurlaBuildingCollapse | A total of three people have died so far. Rescue operation underway: BMC
— ANI (@ANI) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#KurlaBuildingCollapse | A total of three people have died so far. Rescue operation underway: BMC
— ANI (@ANI) June 28, 2022#KurlaBuildingCollapse | A total of three people have died so far. Rescue operation underway: BMC
— ANI (@ANI) June 28, 2022
हेही वाचा : मुंबईतील वांद्रे परिसरात 3 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 19 जण गंभीर जखमी