ETV Bharat / city

संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis talk about budget
devendra fadnavis talk about budget
author img

By

Published : Feb 1, 2021, 7:19 PM IST

Updated : Feb 1, 2021, 9:35 PM IST

मुंबई - संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे.

फडणवीस म्हणाले, की केंद्र सरकारने नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अंतर्गत देण्यात आल्याची माहिती देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहे.

कर दहशतवादी संपवणारा अर्थसंकल्प -

कर एजन्सीजमार्फत केला जाणारा कर दहशतवाद पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटनं केलं आहे, असा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासाठी नवी व्यवस्था अस्तित्वात आली असून ती आणखी सक्षम करण्याचे काम सुरु असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं.

बजेटचं कौतुक करताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट हे महत्वाकांक्षी आणि आत्मविश्वासानं भरलेलं आत्मनिर्भर भारताचं बजेट आहे. अतिशय संक्रमणाच्या परिस्थितीत प्रचंड मोठी आव्हाने समोर असताना लॉकडाउनमुळे मोठी तूट निर्माण झालेली असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल, याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विशेषतः सहा क्षेत्रांवर या बजेटमध्ये फोकस करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य, अर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, नाविन्यता संशोधन आणि विकास आणि मिनिमम गव्हर्नमेंट-मॅक्सिमम गव्हर्नन्स यांचा समावेश आहे.

पायाभूत सुविधांना गती देणारा अर्थसंकल्प -

शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योजक अशा सर्वच आघाड्यांवर विकासाला एक नवीन गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी कायद्यांवरून देशात आंदोलन सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितींच्या अधिकारांवर गदा येतील, अशी शंका सर्वत्र घेतली जात होती. पण, या अर्थसंकल्पातून बाजार समित्यांना भक्कम करण्यासाठी निधीची तरतूद करून बाजार समित्यांबाबत सरकारने एकप्रकारे आपले धोरण स्पष्ट केले आहे. सूक्ष्म सिंचनासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. धान्यखरेदीची आकडेवारी स्पष्ट करताना किमान आधारभूत किंमतीसाठी केंद्र सरकार कसे प्रतिबद्ध आहे, हेच दिसून येते. गहू, तांदूळ यांची गेल्या सरकारपेक्षा दुपटीहून अधिक, तर दाळीची 5 पटीहून अधिक खरेदी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रासाठीची तरतूद पाहिली तर 2013-14 च्या तुलनेत 5 पट अधिक तरतूद शेती क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. एकूण विचार केला तर 16 लाख कोटी रूपये इतके कर्ज शेतकर्‍यांना उभारता येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची आनंदाची बातमी -

महाराष्ट्रासाठी सर्वाधिक आनंदाची बातमी म्हणजे नागपूर मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 5976 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून, नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी नीओ मेट्रोचे एक नवीन प्रारूप आमच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते. मला आनंद आहे की, हे प्रारूप केंद्र सरकारने स्वीकारले आणि आता देशातील अन्य शहरांमध्ये सुद्धा ही संकल्पना स्वीकारली जाणार आहे. नाशिक आणि नागपूरचा टप्पा-2 हे दोन्ही प्रस्ताव आमच्या सरकारच्या काळात पाठविण्यात आले होते. ते स्वीकारल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा हा अर्थसंकल्प -

नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यासाठी 15 हजार नवीन शाळांचा प्रस्ताव आणि उच्च शिक्षण परिषदेची संकल्पना साकारण्यात येणार आहे. 100 नवीन सैनिकी शाळांची तरतूद सुद्धा दूरगामी फायद्याची आहे. मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरसह राष्ट्रीय रस्ते निर्माणासाठी 1,18,000 कोटी आणि रेल्वेसाठी 1,10,055 कोटी अशा सुमारे 1.30 लाख कोटींची गुंतवणूक पायाभूत क्षेत्राला आणखी भक्कम करणारी आहे. परवडणार्‍या घरांसाठी प्राप्तीकरात व्याजसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे परवडणार्‍या घरांना चालना मिळेल. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमांतून लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देत असतानाच आजच्या अर्थसंकल्पात आणखी 15,700 कोटी रूपयांची तरतूद एमएसएमईसाठी करण्यात आली आहे. एकूणच कोरोना संकटामुळे एक प्रकारची नकारात्मकता देशात असताना सुद्धा देशाला आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.