ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

राज्य सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022 ) हा सर्वसमावेश आणि सर्व घटकांना न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde On Maharashtra Budget 2022 ) यांनी दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Mar 11, 2022, 7:53 PM IST

मुंबई - राज्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी अर्थसंकल्पात ( Maharashtra Budget 2022 ) भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला, बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव, पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ( Eknath Shinde On Maharashtra Budget 2022 ) दिली.

नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल

गेल्या दोन वर्षांत एमएमआरडीए, सिडको, पीएमआरडीए यांसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून नगरविकास विभागाने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आदी क्षेत्रात अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. विभागासाठी जवळपास पावणे नऊ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यभरात समृद्धी महामार्ग यासह अनेक महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण एक्स्प्रेस वे सारखा नवा प्रकल्प हाती घेतला जाणार असून त्यासाठी देखील भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल, असे मंत्री शिंदे म्हणाले.

अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी विशेष रुग्णालय

गडचिरोली जिल्ह्यातील माझ्या पोलिस बांधवांना मिळणाऱ्या विशेष भत्त्यात वाढ केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. सैन्य दलाच्या धर्तीवर अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कौशल्यविकासावर अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. एकंदरीत कोविड आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झालेला असतानाही राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.