ETV Bharat / city

Wankhede Transferred In DRI : वानखेडे यांची बदली, बृजेंद्र चौधरींकडे NCB Zonal Director पदाचा अतिरिक्त कार्यभार - समीर वानखेडे यांची बदली

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गृह संवर्गातील महसूल गुप्तचर संचालनालयामध्ये (Directorate of Revenue Intelligence ) परत पाठवण्याचे (NCB Mumbai zonal director Sameer Wankhede) आदेश सोमवारी प्राप्त झाले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी वानखेडे यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. (NCB Zonal Director) नंतर त्यांचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला. तो कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपला.

वानखेडे यांची DRI मध्ये बदली
वानखेडे यांची DRI मध्ये बदली
author img

By

Published : Jan 4, 2022, 12:22 PM IST

Updated : Jan 4, 2022, 12:41 PM IST

मुंबई - समीर वानखेडे यांना मुंबई झोनल डायरेक्टर (Wankhede Transferred In DRI) पदी मुदतवाढ न मिळाल्याने अखेर समीर वानखेडे यांची सोमवार 3 जानेवारी रोजी डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीचा मुंबईतील नवा बॉस कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Additional Charge of NCB Zonal Director To Brijendra Chaudhary) या पदाचा अतिरिक्त कार्यभार बृजेंद्र चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांना मुदतवाढ न देता त्यांची डीआरआयमध्ये पाठवणी

एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुदतवाढ न देता त्यांची डीआरआयमध्ये पाठवणी करण्यात आली. सोमवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. (NCB Mumbai zonal director Sameer Wankhede) समीर वानखेडे हे मागील काही दिवसांपासून क्रुज ड्रग्ज प्रकरणी चांगलेच चर्चेत आलेत. यात त्यांच्यावर एकतर्फी कारवाई केल्याच्या मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. तसेच नोकरी मिळवण्यासाठी (NCB Zonal Director To Brijendra Chaudhary) त्यांनी खोटी कागदपत्रे बनिवली याचबरोबर फक्त 17 व्या वर्षी समीर वानखडे यांना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न सुद्धा मलिक यांनी उपस्थित केला होता.

बृजेंद्र चौधरी हे सध्या एनसीबीचे इंदूर विभागीय संचालक आहेत

या सर्व प्रकरणात राज्यात बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांची बदली व्हावी ही मागणीला जोर धरला आहे. बृजेंद्र चौधरी हे सध्या एनसीबीचे इंदूर विभागीय संचालक आहेत. मुंबई विभागासाठी पूर्णवेळ संचालक नियुक्त करेपर्यंत या पदाचीही जबाबदारी आता चौधरी यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे एनसीबी मुंबईचा पुढचा पूर्णवेळ बॉस कोण असणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित राहणार आहे.

माझ्यावर दबाव टाकला जात आहे अशी दिली होती माहिती

कार्डीला क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी झाल्याने एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड स्टार आर्यन खान याला अटक केली होती. आर्यन खान आणि समीर खानप्रकरणी एनसीबीच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर जे काही होईल ते कोर्टासमोर येईल, माझ्यावर दबाव टाकला जात आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे पश्चिम विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली होती.

डीआरआयमध्ये बदली

या प्रकरणानंतर आजपर्यंत मलिक आणि वानखेडे यांचे वाकयुद्ध चालूच आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी वानखेडे यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. नंतर त्यांचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला. तो कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपला आहे. आता त्यांची डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा - MDCC Bank : सहकार विभागाचा दरेकर यांना झटका; मजूर म्हणून केले 'अपात्र'

Last Updated : Jan 4, 2022, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.