सांगली - एका टेंडरच्या वादातून सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्या मधील साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे.राड्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती दिराला मारहाण देखील झाली असून याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News : भाजपा आमदार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात हजर - लेटेस्ट महाराष्ट्र न्यूज
22:41 January 24
टेंडरच्या वादातून सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यात जोरदार राडा
22:32 January 24
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील पाठवा, राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
21:16 January 24
अखेर जुगाड गाडीच्या बदल्यात महिंद्राची बोलेरो गाडी लोहार कुटुंबाने घेतली
सांगली - अखेर जुगाड गाडीच्या बदल्यात महिंद्राची बोलेरो गाडी लोहार कुटुंबाने घेतली..महिंद्रा कंपनीला आपली जुगाड जिप्सी गाडी घेऊन दत्तात्रय लोहार यांनी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देऊ केलेली ऑफर स्वीकारली आहे. सांगली मध्ये आज महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये गाडीचा आदान- प्रदान सोहळा पार पडला.
21:10 January 24
राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटली, आज 28 हजार बाधितांची नोंद; 36 जणांचा मृत्यू
मुंबई - मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीत मोठी घट दिसून आली आहे. आज 28 हजार नव्या यांची राज्यात नोंद झाली असून त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला आहे तर एकवीस हजार रुग्ण बरे झाले आहेत, असा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. दुसरीकडे रविवारी ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता मात्र आज 86 रूग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मधील आहेत असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
21:03 January 24
मुंबईतील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द परिसरात गुरुवारी १८ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
मुंबई - मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरुवारी, २७ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम २८ जानेवारीला शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. या कालावधीत म्हणजे गुरुवारी सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एम पूर्व आणि एम पश्चिम म्हणजेच चेंबूर, मानखुर्द गोवंडी आदी विभागांतील पाणीपुरवठा १८ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
20:18 January 24
#COVID19 | पुण्यात आज 7,984 नवीन रुग्ण आणि 14 मृत्यूची नोंद
19:51 January 24
ऋषिकेश देशमुखला आजही अटकपूर्व जामिनावर मुंबई विशेष PMLA कोर्टाचा दिलासा नाही
मुंबई- 100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली होते मात्र ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात न जाता त्यांनी मुंबई विशेष PMLA न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर आज सोमवार (दि.24) रोजी सुनावणी झाले. ऋषिकेश देशमुख यांचेकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी बाजू मांडले मात्र तरीदेखील न्यायालयाने दिलासा दिला नसून पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे.
18:44 January 24
भाजप युवा मोर्चाकडून शिवडीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोलेंच्या विरोधात याचिका दाखल
मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात याचिका दाखल केली.
18:00 January 24
प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई - प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आज हे पुरस्कार जाहीर झाले.
17:21 January 24
चांदीवाल आयोगाने सचिन वाझेने केलेला अर्ज फेटाळला
जॉईंट सीपी मिलिंद भारंबेंना चौकशीकरता बोलण्याचा सचिन वाझेने अर्ज केला होता. तो अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळला.
17:02 January 24
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रेल्वे फलाटावर खाली पडलेल्या प्रवाशाला आरपीएफ जवानाने वाचवले
-
#WATCH | Maharashtra: An RPF (Railway Protection Force) jawan rescued a passenger who fell down on the railway platform while trying to board a moving train at Vasai Railway Station on 23rd January. pic.twitter.com/Pxy2u467ZJ
— ANI (@ANI) January 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: An RPF (Railway Protection Force) jawan rescued a passenger who fell down on the railway platform while trying to board a moving train at Vasai Railway Station on 23rd January. pic.twitter.com/Pxy2u467ZJ
— ANI (@ANI) January 24, 2022#WATCH | Maharashtra: An RPF (Railway Protection Force) jawan rescued a passenger who fell down on the railway platform while trying to board a moving train at Vasai Railway Station on 23rd January. pic.twitter.com/Pxy2u467ZJ
— ANI (@ANI) January 24, 2022
पालघर - वसई रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रेल्वे फलाटावर खाली पडलेल्या एका प्रवाशाला आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवानाने वाचवले. ही घटना 23 जानेवारीची असल्याची माहिती समोर आली आहे.
16:44 January 24
अँटी नॅटकोटिक्स सेलची मोठी कारवाई, 115 किलो गांजा ड्रग्ज जप्त, 2 तस्करांना अटक
मुंबई - अँटी नार्कोटिक सेलच्या कांदिवली युनिटने घाटकोपर भागातील 2 ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली. जे ओडिशातून मुंबईत ड्रग्ज पुरवण्यासाठी आले होते. कांदिवली युनिटने या पेडलर्सकडून 115 किलो गांजा ड्रग्ज जप्त केला असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 28 लाख 75 हजार रुपये आहे. यावेळी पोलिसांनी ही कारही जप्त केली आहे. इम्रान अबरार हुसेन अन्सारी (वय 42) व इस्माईल सलीम शेख (वय 21 वर्षे) या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
16:17 January 24
पुण्यातून 15 दिवस ते 1 महिना वयाच्या तीन बिबट्याच्या पिल्लांची सुटका
पुणे - येथील नेरे गावात 15 दिवस ते 1 महिना वयाच्या तीन बिबट्याच्या पिल्लांची (2 मादी आणि 1 नर) आज सुटका करण्यात आली. ते सध्या वन विभागाचे अधिकारी आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत. माता बिबट्याच्या पुनर्मिलनाची प्रक्रिया सुरू आहे
16:07 January 24
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटावर राज्यात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची काँग्रेसची विनंती.

16:01 January 24
नागपूर ओमायक्रॉन व्हेरीयंट...चिंता नको..हे व्हेरीयंट फारसे धोकादायक नाही - डॉ.अविनाश भोंडवे
पुणे - जगभरात धुमागूळ घातलेल्या ओमायक्रॉन व्हायरसमध्ये नागपूर येथे 3 म्युटेशन आढळले आहेत.त्यावर भीतीचे किंवा चिंतेचे वातावरण नसून कोरोनाच्या बाबतीत अश्या पद्धतीने नवनवीन व्हेरियंट येतील आणि नागपूरमध्ये जे व्हेरियंट आढळून आले आहेत.ते फारसे धोकादायक नाही.अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली.
15:44 January 24
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली शरद पवार यांची चौकशी. कोविड झाल्याचे कळताचं तब्येतीच्या चौकशीसाठी मोदींकडून शरद पवारांना फोन
15:06 January 24
अँटेलिया स्फोटकं प्रकरणात NIA कडून दाखल केलेली यूएपीए कलम रद्द करण्यासाठी सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई - मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर माजी एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली होती. सचिन वाझे यांच्यावर अनेक कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या मधील यूएपीए कलम दहशतवादी कारवायाशी संबंधित असलेले कलम रद्द करण्यात यावੇ याकरता सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज धाव घेतली आहे.
14:46 January 24
ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 भावंडे ठार
परभणी ब्रेकिंग
ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 भावंडे ठार
परभणी-जिंतूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 भावांसह 1 चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज सोमवारी, (२४ जानेवारी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली
14:17 January 24
Breaking News : भाजपा आमदार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात हजर
सिंधुदुर्ग - भाजपा आमदार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा संतोष परब हल्ला प्रकरणात शोध घेत होते, मात्र नितेश राणेंचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.
भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. नितेश राणे अचानक पोलिसांसमोर हजर झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
13:57 January 24
कोरोनाबाधितांचे मृत्यू प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मदत का दिली नाही, सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
मुंबई - कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना भरपाई संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक संस्था प्रमेय फौंडेशनने याचिका दाखल केली होती. यावेळी कोरोनात मृत्यूमुखी झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मदत का दिली नाही, असा सवाल करत सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
झोपडपट्ट्यांमधील हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज दिला असताना किंवा पोस्टाने अर्ज पाठवले असतानाही प्रशासनाकडून ऑनलाईन अर्जच मागवून भरपाईच्या रकमेपासून वंचित ठेवले जात आहे, असे निदर्शनास आणणारी प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनने जनहित याचिका दाखल केली आहे.
13:54 January 24
Breaking News : शरद पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन
पुणे - शरद पवारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याप्रकरणी त्यांनी माहिती देऊन संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
13:15 January 24
Breaking News : सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कलम रद्द करण्यासाठी सचिन वाझेने उच्च न्यायालयात धाव घेतली. सचिन वाझेची यूएपीए कलम रद्द करण्याची मागणी.
12:21 January 24
Breaking News : नाना पटोले यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन
औरंगाबाद - नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपने सिडको चौकात आंदोलन पुकारले आहे.
12:16 January 24
Breaking News : बेकायदेशीर दंड प्रकरण, प्रताप सरनाईकांचे राज्यपालांना पत्र
मुंबई - प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. सरकारने माफ केलेल्या करासाठी त्यांनी हे पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
12:09 January 24
Breaking News : भाजपने मित्रपक्ष संपवले - नवाब मलिक
मुंबई - भाजपने ज्या पक्षांसोबत युती केली, ते पक्ष संपवले आहेत. शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केली, मात्र त्यांच्यासोबतही तसाच प्रयत्न झाला. विशिष्ट धर्मावरुन एकत्र एक चांगले आहे, मात्र त्यामुळे इतर धर्माचा तिरस्कार करणे वाईट असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.
12:08 January 24
Breaking News :राज्य अंधारात गेले, तर फक्त काँग्रेस जवाबदार राहणार नाही - नितीन राऊत
नागपूर - राज्य अंधारात गेले, तर फक्त काँग्रेस जवाबदार राहणार नाही, त्याला महाविकास आघाडी जवाबदार असेल, असे पत्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावर नितीन राऊत यांनी आज पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या ऊर्जा खाते माझ्याकडे आहे, कधी कधी खटके उडत असतात, सीएम यांच्यापर्यंत पूर्ण माहिती नसते, म्हणून ऊर्जा खात्याची चॅलेंजेस काय आहेत याची माहिती सीएम, नाना यांना सर्वांना माहिती व्हावी, म्हणून पत्र लिहिले आहे
काही दिवसांपासून कोळशाची टंचाई सुरू आहे, पैसे लागणारच यावर चर्चा व्हाययला पाहिजे,नगरविकास व ग्रामविकास खात्याकडून निधी प्राप्त झाला नाही म्हणून शिरसाठ नेत्यांना कळवणे भाग आहे.
11:45 January 24
Breaking News : इचलकरंजीत कंपनीला भीषण आग, कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक
कोल्हापूर - कंपनीत आग लागून कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक झाली. ही घटना इचलकरंजी औद्योगिक क्षेत्रातातील परिसरात घडली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
11:32 January 24

11:00 January 24
दिवंगत बाळासाहेबांच्या विचारधारेवर शिवसेना चालते का, याचे उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे - राम कदम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्यापेक्षा शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालते का, असा सवाल आमदार राम कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर सडकून टीका केली, याला ते प्रत्युत्तर देत होते.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कधीच काँग्रेससोबत जाणार नाही, तशी वेळा आलीच तर मी शिवसेना बंद करेल असे वक्तव्य केले होते. त्याचा हवाला देऊन राम कदम यांनी टीका केली आहे.
10:51 January 24
Breaking News : भाजपला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही - संजय राऊत
मुंबई - उद्धव ठाकरे जनतेसमोर बोलतात, हे पाहूनच विरोधकांचे धाबे दणणाल्याचा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
भाजपच्या विरोधात शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेरही लढायचे ठरवले आहे. लगेच यश मिळणार नाही, पण नक्की मिळेल. भाजपने ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावे, त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही ते म्हणाले.
09:50 January 24
Breaking News : धक्कादायक, ओमायक्रॉनचे तीन नवे व्हेरियंट वाढवणार चिंता
नागपूर - कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे नागपुरात धुमाकूळ घातला असताना आता ओमायक्रॉनसुद्धा टेंशन वाढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन आढळून आले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये सुरू असलेल्या जीनोम सीक्वेन्सिंग दरम्यान चाचण्यांमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ओमायक्रॉनचे म्युटेशन किती घातक आहेत, या संदर्भात निरीतील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
09:27 January 24
Breaking News : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात 5 ठार, 2 गंभीर
पुणे - नगर रोडवर तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 5 जण ठार झाल्याने खळबळ उडाली. या अपघातात दोन जणांची प्रकृत्ती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
09:19 January 24
Breaking News : ओबीसींच्या राजकीय आरक्षण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली बैठक
मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे. बीसींचे मागासवर्गीय आरक्षण संदर्भात दोन आठवड्यात अहवाल सादर करायचा आहे. पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे
09:13 January 24
Breaking News : नाशिक पारा घसरला, निफाडचे निच्चांकी 5.5 अंश, तर तोरणाळचे तापमान 4 अंशावर
नाशिक - शहराचा पारा घसरल्याने नागरिक गारठले आहेत. नाशिकचा पारा 6.6 अंशावर गेला आहे, तर निफाडचे निच्चांकी 5.5 अंश आणि तोरणमाळचे तापमान 4 अंशावर पोहोचले आहे. ही या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद..
09:09 January 24
Breaking News: उमरेड विवस्त्र डान्स प्रकरण, आणखी सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक
नागपूर - उमरेड विवस्त्र डान्स प्रकरणात पोलिसांनी आणखी सहा आरोपींना अटक केली आहे. याआधी आयोजकांसह विवस्त्र डान्स करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती.
09:06 January 24
Breaking News: चोर समजून टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नातेवाईक संतप्त
मुंबई - समतानगर परिसरात टोळक्याने चोर समजून तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याचे नातेवाईक संतप्त झाले. या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह पोलीस आयुक्तालयात आणल्याने तणाव निर्माण झाला.
09:02 January 24
Breaking News: मुंबईत उघडल्या 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा, कोरोना नियमांचे पालन
मुंबई - कोरोना नियमांचे पालन करुन मुंबई महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. वडाळा येथील आंध्र शिक्षण संस्थेतील शाळा उघड्यात आली. यावेळी पुन्हा शाळा सुरू झाल्याने आनंद झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. कोरोना नियमांचे पालन करणार असल्याचेही विद्यार्थी म्हणाले.
08:20 January 24
Breaking News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्यात आले. माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात हा पुतळा बसवण्यात आला आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशओरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
08:14 January 24
Breaking News : उर्जामंत्री नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना, राष्ट्रवादीकडील मंत्रालयाने बील थकवल्याची केली तक्रार
मुंबई - उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थकीत वीजबीलाबाबत पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांची थकबाकी लवकर देण्याबाबतची तक्रार केली आहे. त्यासह वित्त विभागाच्या अनुदानाचा मुद्दाही त्यांनी या फत्रात नमूद केला आहे. नितीन राऊत यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत पुन्हा मिठाचा खडा टाकल्याची चर्चा होत आहे.
07:53 January 24
आजपासून शाळेत होणार पुन्हा किलबिलाट
मुंबई - कोरोना वाढवल्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून या शाळाच पुन्हा किलबिलाच सुरू होणार आहे. कोरोना वाढल्यामुळे पुण्यातील शाळा आज सुरू होणार नाही. दरम्यान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही शाळेत येणे बंधनकारक केले नाही. त्यातही काही जिल्ह्यात शाळा सुरू होतील मात्र काही जिल्ह्यातील शाळा सुरू होणार नसल्याचेही ते म्हणाले.