ETV Bharat / city

Breaking News Live Page 6 June 2022; 15 जून रोजी कोविडवरील उपायांसह शाळा उघडू - मंत्री वर्षा गायकवाड

Breaking News Live Page 6 June 2022
Breaking News Live Page 6 June 2022
author img

By

Published : Jun 6, 2022, 6:50 AM IST

Updated : Jun 6, 2022, 2:10 PM IST

14:08 June 06

महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात तक्रार करण्याकरिता सोमैया पोलिसांकडे

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया पोलीस महासंचालक कार्यालयात दाखल. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात तक्रार करण्याकरिता सोमैया पोलिसांकडे पोहोचले.

13:44 June 06

राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी खार पोलिसांची नोटीस

मुंबई - राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी खार पोलिसांनी नोटीस दिली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खार पोलीस राणा दाम्पत्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. हनुमान चालीसा प्रकरणी त्यांच्यावर अनेक आरोप आहेत.

13:27 June 06

15 जून रोजी कोविडवरील उपायांसह शाळा उघडू - मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - आम्ही कोविड परिस्थितीचा आढावा घेत आहोत. कोरोना रुग्ण वाढत आहेत. परंतु आम्ही 15 जून रोजी कोविडवरील उपायांसह शाळा उघडू. मास्क अनिवार्य नाही. शाळांना नवीन SOP जारी करण्यात येणार आहेत. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

11:50 June 06

सलमान खानची सुरक्षा वाढवणार

सलमान
सलमान

मुंबई - सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांची टीम दाखल झाली आहे. सुरक्षेविषयी माहिती घेण्यासाठी पोलीस आलेत. काल सलमान खानच्या वडिलांना धमकीचे पत्र मिळाले होते. आज मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेविषयी वरिष्ठ अधिकारी आढावा घेत आहेत. सलमान खानची सुरक्षा अजून वाढवण्याची तयारी सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते.

11:47 June 06

मलिक, देशमुखांच्या मदतान याचिकेवर निर्णय नाही, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले

मलिक, देशमुखांच्या मदतान याचिकेवर निर्णय नाही

मुंबई - अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदान परवानगी याचिकेवर निर्णय झाला नाही. ईडीने उत्तर दाखल करण्याकरिता 7 जूनपर्यंत वेळ मागितला आहे. आता या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होईल. राज्यसभेत निवडणुकीकरिता 10 जून रोजी होणार मतदान आहे.

11:16 June 06

सिद्धू मुसेवाला हत्येमागे पुणे कनेक्शन

पुणे - पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे आता पुणे कनेक्शन असल्याचे सांगितलं जाते आहे. पंजाब पोलिसांनी देवेंद्र उर्फ काला याला अटक केली आहे. पण इतर दोन जे संशयित आहेत ते संतोष जाधव आणि सौरभ महाकाल हे असून हे दोघे पुण्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

09:42 June 06

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थक घोषणाबाजी

अमृतसर: सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर लोकांचा एक गट जमला आहे. खलिस्तान समर्थक घोषणाबाजी ते करत आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर त्यांनी हाती घेतले आहेत.

09:03 June 06

मुंबई - राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकी होत आहेत. त्या पार्श्वभूमिवर मतदान करण्यासाठी संधी मिळावी याचा प्रयत्न ईडीची कारवाई सुरू असलेल्या माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी कोर्टात धाव घेतली आहे. नवाब मलिक, अनिल देशमुखाच्या मतदानाच्या याचिकेवर आज निर्णय होणार आहे.

08:57 June 06

विक्रमगडमधील जवानाला पठाणकोट येथे वीरमरण, आज अंत्यसंस्कार

पालघर : विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा पडवळे यांना वीरमरण आले. ते पंजाब प्रांतातील पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. महेश रामा पडवळे यांचे पार्थिव मुंबईत आल्यानंतर आज (6 जून) त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

08:53 June 06

दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्या निवासस्थानावर छापा

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराप्रकरणी दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्या निवासस्थानावर छापा टाकला.

06:53 June 06

यमुनोत्री अपघातातील मृतांचा आकडा २६ वर

उत्तरकाशी ( उत्तराखंड ) : यमुनोत्री अपघातातील मृतांचा आकडा २६ वर. बस दरीत कोसळून झाला होता अपघात. पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी केले दुःख व्यक्त. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिह रवाना.

06:46 June 06

breaking news live page 6 June 2022; विनोद कुकवेअर कंपनीला भीषण आग

विनोद कुकवेअर कंपनीला भीषण आग
विनोद कुकवेअर कंपनीला भीषण आग

पालघर- येथील बाच्छुभाई भाई इंडस्ट्रीज ( बिडको ) येथील विनोद कुकवेअर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू.

Last Updated : Jun 6, 2022, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.