ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं..नागपूरमधील काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल - मराठी आजच्या ठळक बातम्या

ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jun 15, 2022, 6:30 AM IST

Updated : Jun 15, 2022, 1:56 PM IST

13:55 June 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं..नागपूरमधील काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल

  • FIR registered against Maharashtra Congress leader Sheikh Hussain at Gittikhadan PS in Nagpur for using derogatory language against PM Modi. FIR registered last night u/s 294 (obscene acts and songs) and 504 IPC (intentional insult with intent to provoke breach of the peace).

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नागपूर- नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुस्सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

13:51 June 15

भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून काही लोकांच्या पोटात दुखतयं- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांचे एकमेकांबद्दल चांगले मत आहे. तसेच भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच देहू मधील मंचावरील प्रसंगाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोक वाद निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे

13:32 June 15

अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई- अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरा उर्फ ​​करणवीर बोहरा याच्यासह ६ जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोहरा याच्यावर अंधेरीच्या ओशिवरा भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेकडून 1 कोटी 99 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. महिला कपड्यांचा व्यवसाय करते. या महिलेकडून घेतलेले पैसे अभिनेत्याने परत केले नाही असा आरोप महिलेचा आहे

13:28 June 15

राज्य सरकारला कंजूरमार्ग प्रस्तावित जमिनीबाबत मोठा दिलासा

मुंबई- राज्य सरकारला कंजूरमार्ग प्रस्तावित जमिनीबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी कंपनीने न्यायालयाचीच फसवणूक केल्याचे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. एका खासगी कंपनीने कंजूरच्या जमिनीवर दावा केला होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीबाबतच्या वादाबाबत भाष्य करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

12:55 June 15

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ५जी स्पेक्ट्रमला मंजुरी

नवी दिल्ली- दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोड आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ५जी स्पेक्ट्रमला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटचा मार्ग मोकळा होणार आहे.

12:53 June 15

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयासमोर जाळले टायर

  • #WATCH | Delhi: Congress workers outside the Enforcement Directorate office burn tires in protest to the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/eG3Qnq57oX

नवी दिल्ली - काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील ईडी कार्यालसमोर टायर जाळत निषेध केला आहे. नॅशनल हॅराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

12:49 June 15

ईडी चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले मंत्री अनिल परब पोहोचले साई दरबारी

अहमदनगर- राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावले. त्यानंतर ते आज शिर्डी साईबाबांच्या दरबारी पोहचले आहेत. ईडीने अनिल परब यांना आज ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. मे महिन्यात साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने 7 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यादिवशी अनिल परब यांची 13 तास चौकशी करण्यात आली होती. आता अनिल परब यांना ईडीने समन्स दिले आहे.

12:29 June 15

जामीन रद्द प्रकरणात राणा दाम्पत्य सत्र न्यायालयात हजर पुढील सुनावणी 27 जून रोजी

मुंबई- राज्य सरकारतर्फे नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे. त्या संदर्भात दोघेही आज हजर झाले. मागील सुनावणीस राणा दाम्पत्य गैरहजर होते.

11:49 June 15

नाशकात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या

नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील परिचारिका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणार्थी परिचारिकेने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

11:44 June 15

अनिल देशमुख नवाब मलिक यांच्या मतदान परवानगी याचिकेवर उद्या सुनावणी

अनिल देशमुख नवाब मलिक
अनिल देशमुख नवाब मलिक

मुंबई- मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सकाळीच हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. आज 38 क्रमांकावर होणारी सुनावणी दिवसभराच्या कामकाजात होईल की नाही याची साशंकता असल्याने वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

11:42 June 15

शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या रिट याचिकेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप

मुंबई - शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या रिट याचिकेवर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदविला आहे. रिट याचिका नव्हे तर इलेक्शन पीटीशन दाखल करण्याची मागणी केली आहे. पुढील सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कांदे यांचा राज्यसभा निवडणुकीत मत बाद केला होते.

11:22 June 15

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात दाखल

मुंबई- जामीन दिलेल्या अटी व शर्तीचा उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयात हजर झाले आहेत.

10:55 June 15

मुंबई महापालिकेने पाच वर्षांत मारले १६ लाख ४५ हजार उंदीर

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्याचसोबत पावसाचे पाणी साचल्याने त्यातून चालणाऱ्या नागरिकांना लेप्टो होण्याचा धोका असतो. यासाठी पालिकेकडून उंदीर मारले जातात. जानेवारी २०१८ ते मे २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत तब्बल १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारल्याची माहिती पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून देण्यात आली आहे.

10:49 June 15

ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला सुभाष देसाई रवाना

मुंबई- राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होत आहे.शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे.

10:46 June 15

अनिल परब आज ईडीसमोर राहणार गैरहजर

अनिल परब
अनिल परब

मुंबई- परिवहन मंत्री पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे आज ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. ते वकिलामार्फत ईडीला उत्तर देणार आहेत. ईडीने आज अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले होते

09:37 June 15

जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंध असलेली शैक्षणिक संस्था १५ दिवसात होणार सीलबंद

  • Educational institutions run by Falah-e-Aam Trust (FAT), an affiliate of the banned Jamat-e-Islami org, to be sealed within 15 days.

    All students studying in such institutions will enroll in nearby govt schools. No new admission to be taken & registrations to be done: J&K Govt pic.twitter.com/oNHgXNxxIh

श्रीनगर- जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंध असलेल्या फतेह-ए-आम ही शैक्षणिक संस्था १५ दिवसात सीलबंद होणार आहेत. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात प्रवेश दिला जाणार आहे. या शैक्षणिक संस्थेमध्ये नवीन प्रवेश नोंदणी होणार नसल्याचे जम्मू काश्मीर सरकारने म्हटले आहे.

08:48 June 15

वर्षा निवासस्थानावरून आदित्य ठाकरे विमानतळाला पोहोचले

आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम
आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून मुंबई विमानतळाला पोहोचले आहेत. ते आज अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

08:24 June 15

झाड कोसळल्याने खासदार ओम निंबाळकर यांच्या वाहनाचे नुकसान

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईत आलेले शिवसेना खासदार ओम निंबाळकर यांच्या वाहनावर झाड कोसळले आहे. यामुळे त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा गाडीत कोणीही नव्हते यामुळे जीवितहानी झालेली नाही.

08:14 June 15

लष्कर तोयबाचे दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची कामगिरी

  • #UPDATE | One of the killed terrorists has been identified as Jan Mohd Lone of Shopian. Besides other terror crimes, he was involved in the recent killing of Vijay Kumar, bank manager on June 2 in Kulgam district: IGP Kashmir

    (File Pic) pic.twitter.com/rd2N560uHX

    — ANI (@ANI) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रीनगर- लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी सुरक्षा दलाने ठार केले आहेत. त्यामधील जन मोहम्मद लोन हा शोपियानमधील रहिवाशी होता. बँक व्यवस्थापक विजय कुमार याच्या हत्येत त्याचा सहभाग होता, असे काश्मीरच्या आयजीपींनी सांगितले.

07:18 June 15

आदित्य ठाकरेंचा आज अयोध्येत सहा तास राहणार, धार्मिक कार्यक्रमाला राहणार उपस्थित

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येला पोहोचणार आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे हे श्री राम लल्लाचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी अयोध्येत पोहोचून तयारीचा आढावा घेतला.

06:38 June 15

सर्व विरोधी पक्षांना एकमताने उमेदवार देण्याची इच्छा, सोनिया गांधींची शरद पवार, ममता बॅनर्जींशी चर्चा

नवी दिल्ली - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकमताने उमेदवार देण्याची इच्छा आहे. त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकी येण्याकरिता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, डीएमके यांच्याशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

06:21 June 15

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून न दिल्यामुळे विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाषणाबाबत मला देखील कोणतीच कल्पना नव्हती. दिल्लीमध्ये भाषण कोणाचे होणार हे प्रोटोकॉल नुसार ठरले होते. मात्र वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात कोणतेही राजकारण येऊ नये, असे वाटतं अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 15, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.