ETV Bharat / city

Golden Boy : ...म्हणून तो बनला 'गोल्डन बॉय' - उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेला गोल्डन बॉय

आपले वेगळे अस्तित्व तयार करण्यासाठी जगभरात लोक काहीही करताना पाहायला मिळतात. आपली वेगळी ओळख असावी, लोकांनी त्यासाठी आपल्याला ओळखावे, अशी इच्छा अनेकांची असते. ती इच्छा घेऊन उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेला गोल्डन बॉय ( Golden Boy ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. चर्चगेट स्टेशन परिसरात आपल्या संपूर्ण अंगाला सोनेरी रंग लावून एखाद्या पुतळ्या प्रमाणे उभे राहण्याची कला नूर आलम या तरुणाने चांगलीच आत्मसात केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2022, 8:56 PM IST

Updated : Apr 11, 2022, 9:53 PM IST

मुंबई - आपले वेगळे अस्तित्व तयार करण्यासाठी जगभरात लोक काहीही करताना पाहायला मिळतात. आपली वेगळी ओळख असावी, लोकांनी त्यासाठी आपल्याला ओळखावे, अशी इच्छा अनेकांची असते. ती इच्छा घेऊन उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेला गोल्डन बॉय ( Golden Boy ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. चर्चगेट स्टेशन परिसरात आपल्या संपूर्ण अंगाला सोनेरी रंग लावून एखाद्या पुतळ्या प्रमाणे उभे राहण्याची कला नूर आलम या तरुणाने चांगलीच आत्मसात केली आहे. संपूर्ण अंगावर सोनेरी रंग थापून गोल्डन बॉयच्या रूपात तयार होऊन रस्त्याच्या लगत किंवा फुटपाथवर पुतळ्या प्रमाणे जेव्हा नूर उभा राहतो. त्यावेळेस येणारे जाणारे प्रत्येक जण त्याच्याकडे कुतुहलाने पाहतात. एवढेच काय तर, अनेकांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. नूरच्या या आगळ्यावेगळ्या रूपाला पाहून अनेक जण त्याला आर्थिक मदतही करतात.

तो बनला गोल्डन बॉय

...म्हणून झालो गोल्डन बॉय - नूर आलम हा उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील मोहना या गावचा रहिवाशी आहे. मात्र, घरी असलेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी मुंबईत येण्याचा निश्चय केला. मुंबईत कोणतेही नातेवाईक किंवा निकटवर्तीय नसतानाही केवळ प्रवासात मिळालेल्या मित्रांच्या आशेवर धारावीमध्ये आला. तिथे आपल्या मित्रांच्या ओळखीवर तात्पुरते काम मिळवले. मात्र, त्या कामापासून होणाऱ्या मिळकतीत स्वतःला पुरेल इतकेही पैसे मिळत नव्हते. त्यामूळे या काममुळे आपली उपजीविका होणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करावे लागेल, असा निश्चय नूर आलमने केला. मात्र, नेमके काय करावे हे त्याला सुचत नव्हते. एकेदिवशी इंटरनेट सर्च करत असताना गोल्डन बाय बनण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर, 2021 च्या रात्री पहिल्यांदा नूर हा गोल्डन बॉय झाला. त्या दिवसांपासून नेहमी गोल्डन बॉयच्या वेशामध्ये तो मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये वावरत असतो. तिथे येणारे देशी-परदेशी पर्यटक कुतूहलाने नूर सोबत बोलतात. त्याच्या सोबत फोटो काढतात. यातून आता नूरची चांगली कमाई होत आहे. आपल्या आवडीच्या कामातून मिळकत मिळत असल्याने नूर ला ही या कामात आता मोठा आनंद मिळत आहे.

गोल्डन बॉय बनायला पैसेही नव्हते - इंटरनेटच्या माध्यमातून गोल्डन बनवण्याची कल्पना पुढच्या डोक्यात आली होती मात्र गोल्डन बॉय बनण्यासाठी लागणारा सोनेरी रंग आणि कपडे त्याच्याकडे नव्हते. अशातच धारावी मधील एक खोली रंगवण्याचे काम मिळाले. नूरने एक दिवसात खोली रंगवण्याचे काम पूर्ण केल्यानंतर मिळालेल्या 500 तून गोल्डन बॉय बनण्याचा प्रवास नूरने सुरू केला. मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या नूरने गोल्डन बॉय झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांना देखील आपल्या कामाबद्दल सांगितले उत्तर प्रदेशमध्ये आई वडील आणि दोन भाऊ असे नूरचे कुटुंब असून तेही त्याच्या या कामामुळे आनंदी आहेत.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte Arrest : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

Last Updated : Apr 11, 2022, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.