मुंबई शिवसेना मूळ कोणाची यासाठी सुरू झालेल्या संघर्षाची परिणीती 2 दसरा मेळाव्यामध्ये अवघ्या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली. शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा Shivsena chief Uddhav Thackeray झाला. येथे स्वेच्छेने लोक सामील झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर झाला. या मेळाव्या लोकांना पैसे देऊन बोलावले गेल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी तर केलाच आहे. मात्र या मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाचे Mumbai University कलीना आवार वापरण्यात आले होते. मेळावा संपल्यानंतर तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला विद्यार्थ्यांना आढळला आहे. या कृत्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहे.
विद्यार्थी वर्गाने शिंदे गटावर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात होणार हे काही दिवसापूर्वीच जनतेला उमजले होते. सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रातून हजारो चार चाकी वाहन, दुचाकी वाहनं आणि त्यांच्यासाठी जेवणा खावणाची सुसज्ज यंत्रणा तसेच सेवा तत्पर होते. मात्र चार चाकी गाड्यांना वाहनतळ म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलिना आवारातली मोकळी जागा दिली गेली होती. आता तिथे दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने विद्यार्थी वर्गाने शिंदे गटावर टीका केली आहे.
या संघटनेचा समावेश विद्यापीठाच्या या मोकळ्या मैदानाच्या आजूबाजूला अनेक झाडं होती. ती झाडे देखील मुंबई महानगरपालिकेने तोडली. ही बेकायदा तोडल्याचा आरोप छात्र भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, एआयएसएफ अशा अनेक संघटनांनी निषेध व्यक्त करून विरोध केला. मात्र दसरा मेळावा संपल्यानंतर याच मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खर्च विद्यार्थ्यांना आढळला. त्यामुळे अखिलेश चित्रे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट अमोल मतेले, छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रोहित ढाले, एआयएसएफ विद्यार्थी संघटनेचे मुंबई नेते अमीर काझी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते अमित डोमसे या सर्वांनी या दारूच्या बाटल्यांचा खच पाहून शिंदे गटावर टीका केलेली आहे. विद्यापीठाला राजकारणाचा आखाडा करू नका, यासंदर्भात बेकायदा महापालिकेने जे काम केलेलं आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील सर्वांनी केली आहे.