ETV Bharat / city

उधारीवर घेतलेली 'स्ट्रॉबेरी' विक्रेत्याच्या बेतली जीवावर

उसनवारीच्या वादातून एका स्ट्रॉबेरी विक्रेत्याचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

author img

By

Published : Jan 23, 2021, 6:48 PM IST

ठाणे - उसनवारीच्या वादातून एका स्ट्रॉबेरी विक्रेत्याचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका, परिसरातील श्रीदेवी ज्वेलर्सच्या दुकानाशेजारी असलेल्या गाळ्यात घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोर फरार-

निजामुद्दीन हजरतद्दीन राईन असे खून झालेल्या स्ट्रॉबेरी विक्रेत्याचे नाव आहे. तर अंसार उर्फ पप्पू मोहरम अली राईन (वय ३५, रा, भिवंडी) सद्दाम हुसैन अनवरअली राईन (रा, भिवंडी) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहे. हे दोघेही खून करून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपीने उधारीच्या पैश्यासाठी लावला होता तगादा-

मृत निजामुद्दीन याने आरोपी अंसार उर्फ पप्पू आणि सद्दाम हुसैन यांच्याकडून उधारीवर स्ट्रॉबेरी घाऊक बाजार भावाप्रमाणे घेतली होती. त्यांनतर मृत निजामुद्दीन याने स्ट्रॉबेरीची विक्रीही केली. मात्र आरोपींना उसनवारीची रक्कम परत दिली नाही. त्यामुळे दोन्ही आरोपीने उधारीच्या पैश्यासाठी तगादा लावला असता, मृतक निजामुद्दीन याने उधारीचे पैसे देण्यास नकार देत होता. त्यातच काल रात्रीच्या ११ वाजल्याच्या सुमाराला श्रीदेवी ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी असलेल्या रिजवान सेठ यांच्या गाळ्यात मृत निजामुद्दीन फळे विक्री करीत होता. त्याचवेळी आरोपी अंसार उर्फ पप्पू आणि सद्दाम हुसैन यांनी स्ट्रॉबेरी व फळं विक्रीसाठी घेतलेले उसनवारीचे पैसे मागितले.

302,34 प्रमाणे गुन्हा दाखल-

मात्र उधारीच्या पैश्यातून पुन्हा वाद निर्माण होऊन आरोपींनी लाकडाच्या दांडक्याने निजामुद्दीन वर हल्ला केला. या हल्ल्यात निजामुद्दीन राईन याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात मोहम्मद ताज छोट्टन राईन याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघा हल्लेखोराविरोधात भादंवि कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एन.एम.घोळकर करीत आहेत.

हेही वाचा- पोलिसांनी ठोकल्या पाच चोरट्यांना बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.