ETV Bharat / city

Devendra Fadnavis Public Meeting : देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र दिनी होणाऱ्या बुस्टर डोस सभेची भाजपाकडून जय्यत तयारी! - Maharashtra Day

१ मे महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day ) रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे जाहीर सभा घेत ( Raj Thackeray Public Meeting in Aurangabad ) आहेत. या सभेवरून वातावरण तापलेले असताना आता १ मे रोजी भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे मुंबई येथील सोमैया मैदानावर बूस्टर डोस सभा ( Booster dose meeting of Devendra Fadnavis ) घेणार आहेत. या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिन सन्मान सोहळा असा कार्यक्रम १ मे रोजी भाजपने सोमैया मैदानात आयोजित केला आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडवणीस हे बूस्टर डोस देणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले होते.

Devendra Fadnavis Public Meeting
बुस्टर डोस सभेची भाजपाकडून जय्यत तयारी
author img

By

Published : Apr 29, 2022, 7:23 PM IST

Updated : Apr 29, 2022, 7:29 PM IST

मुंबई - १ मे महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day ) रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे जाहीर सभा घेत ( Raj Thackeray Public Meeting in Aurangabad ) आहेत. या सभेवरून वातावरण तापलेले असताना आता १ मे रोजी भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे मुंबई येथील सोमैया मैदानावर बूस्टर डोस सभा ( Booster dose meeting of Devendra Fadnavis ) घेणार आहेत. या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिन सन्मान सोहळा असा कार्यक्रम १ मे रोजी भाजपने सोमैया मैदानात आयोजित केला आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडवणीस हे बूस्टर डोस देणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले होते. यामध्ये बूस्टर हे भाजप कार्यकर्त्यांसाठी असून डोस हे महाविकास आघाडीला असणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या राज्यात महाविकासआघाडी सरकार विरोधी भाजप असा सामना रंगलेला असताना, आता या सभेमधून देवेंद्र फडवणीस महाविकास आघाडी सरकारातील कोण कोणत्या नेत्यांना व कुठल्या विषयावर डोस पाजतात हे बघणे गरजेचे झालेल आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

ठाकरे सरकार नेहमीच फडणीस यांच्या निशाण्यावर! - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ आमदारांच पाठबळ असूनसुद्धा राज्यात सरकार स्थापन न करता आल्याने भाजपची तळमळ अद्यापही दिसून येत आहे. यातच मी पुन्हा येईन म्हणणारे येऊ शकले नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत असा टोमणा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हल्लीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला होता. एकंदरीत राज्यात महाविकास आघाडी सरकार व भाजप असा सामना रंगलेला असताना महाविकास आघाडी कडून सर्वच नेते भाजपवर हल्लाबोल करायला एकही संधी सोडत नाही आहेत. तर दुसरीकडे या सर्वांचा समाचार एक हाती देवेंद्र फडवणीस घेताना दिसत आहेत. मग ते मैदानातील व्यासपीठ असो किंवा विधानसभा असो. ठाकरे सरकारचा पूर्णता समाचार देवेंद्र फडणीस सक्षमपणे घेताना दिसत आहेत. यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख असतील मंत्री नवाब मलिक असतील हे राष्ट्रवादीचे दोन मोहरे त्यांनी योग्य पद्धतीने गजाआड केले आहेत. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार शिवसेना टार्गेट केली जात आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बघता ही बुस्टर डोस सभा भाजप कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी असणार आहे. त्यामुळे या सभेची जय्यत तयारी ही भाजपा पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

आमचे व मनसेचे एकच विचार - फडणवीस - मनसे भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे व भाजप एकत्र लढतील व यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात असताना याबाबत देवेंद्र फडवणीस यांनी ठामपणे नकार दिला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, भाजपचे जे मुद्दे आहेत तेच मुद्दे सध्या राज ठाकरे हे सुद्धा घेताना दिसत आहेत. विशेष करून हिंदुत्वाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर मशिदीवरील भोंगे यांचा विषय असेल. हे विषय यापूर्वी भाजपने उपस्थित केले आहेत. आता ते विषय राज ठाकरे उपस्थित करत आहेत, म्हणून आमचे व त्यांचे विचार कदाचित एकत्र होतील. परंतु त्यांच्यासोबत युती करण्याचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडून किंवा त्यांच्याकडून अद्याप तरी आलेला नाही आहे. तसेच तशी शक्यताही दिसत नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकारणात काहीही होऊ शकते? नितीन सरदेसाई - दुसरीकडे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी भाजप व मनसे युतीबाबत त्यांना विचारले असता असे सांगितले आहे की, भाजपकडून कुठलाही प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. भाजप व मनसेच्या युतीच्या चर्चा या फक्त माध्यमा मध्येच आहेत. आम्ही कुठल्याही पद्धतीचा प्रस्ताव हा युती संदर्भामध्ये भाजपला दिलेला नाही आहे. परंतु या चर्चांच पेव फार मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेल आहे. या पुढे बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले की राजकारणामध्ये कुठलीही शक्यता नाकारता येत नाही, असं सांगून येणाऱ्या दिवसांमध्ये भाजप व मनसे यांची युती झाली तर त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको असा त्याचा अर्थ होता.

हेही वाचा - Maharashtra Day : महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीस देणार 'बुस्टर डोस'! - आशिष शेलार

Last Updated : Apr 29, 2022, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.