ETV Bharat / city

X -mas New Year Celebration 2022 : ओमायक्रॉनच्या संकटातही पर्यटकांचा चिखलदरा ठाण्यातील पर्यटनस्थळाकडे ओढा, तर महाबळेश्वरकडे पाठ

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Omicron variant in maharashtra ) ओमायक्रॉन विषाणूचा धोका कायम असून त्याचा काही अशी राज्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. मात्र थर्डी फर्स्ट व नाताळ सेलेब्रेशनचे प्लान तरुणाई व उत्साही मंडळी करू लागली आहेत. ठाणे व मेळघात चिखलदऱ्यातील रिसॉर्ट व हॉटेलचे बुकींग फुल्ल झाले असले तर यंदा महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा थंडा प्रतिसाद दिसून येत आहे. महाबळेश्‍वर-पाचगणीचा नाताळ ( Christmas ) पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. ओमायक्रॉनच्या घोंगावणाऱ्या संकटामुळे टाळेबंदी होईल या भितीने महाबळेश्‍वरची हॉटेल, रिसॉर्टमधील बुकींग रद्द होऊ लागली आहेत.

X -mas New Year Celebration
X -mas New Year Celebration
author img

By

Published : Dec 15, 2021, 5:44 PM IST

मुंबई - ठाणे जिल्ह्यात २१ पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य रिसॉर्ट, पालघर जिल्ह्यातील वसई, डहाणू, जव्हार तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रेप पार्क, भंडारदरा, लोणावळा (कार्ला), माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे अशा प्रमुख ठिकाणी पर्यटकांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी (Thirty First party booking full in Chikhaldara) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चिखलदरामध्ये बुकींग सुरु केले आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची असलेल्या दोन्ही रिसॉर्टमध्ये (Chikhaldara Hill Station Resort ) प्रत्येकी 50 टक्के बुकींग झाले आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत हे बुकींग हाऊसफुल्ल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चिखलदरा व मेळघाटातील रिसॉर्टचे 50 टक्के बुकींग -

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा (Omicron variant in maharashtra ) धोका असला तरी त्याचा फार परिणाम पर्यटनावर झालेला नाही. कारण यंदाही ख्रिसमस नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मेळघाट व चिखलदरामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असलेले दोनही रिसॉर्ट राहण्यासाठी पर्यटकांनी (Thirty First party booking full in Chikhaldara) बुकिंग केले आहेत. सध्या 50 टक्के बुकिंग दोन्ही रिसॉर्टचे झाले आहेत. पुढील १० दिवसांत उर्वरित बुकिंग हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणेच यंदाही हजारोच्या संख्येने पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी चिखलदरामध्ये दाखल होणार आहे.

अमरावतीकडे पर्यटकांचा ओढा

अमरावतीच्या चिखलदऱ्यात ही ख्रिसमस नाताळ ते पाच जानेवारीपर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा ओमायक्रॉनचा धोका असल्याने पर्यटकांची गर्दी कमी राहील, असे अनेकांना वाटत होते. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन रिसॉर्ट (Chikhaldara Hill Station Resort ) बरोबर अनेक शासकीय व खाजगी विश्रामगृहे देखील आहेत. हे विश्रामगृहे आता 25 ते 30 तारखे दरम्यान बुकींग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिखलदऱ्यातील विश्रामगृह रिसॉर्ट 100% बुकिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा - ओमायक्रॉन संकटाच्याही सावटातही चिखलदरा, मेळघाटात 'थर्टी फर्स्ट'साठी पर्यटकांचे बुकिंग हाऊसफुल्ल..

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण -

आगामी नववर्षस्वागत ( New Year Celebration 2022 ) आणि नाताळ सुट्टीसाठी ( Christmas holidays ) हौशी पर्यटकांची पाऊले पर्यटनस्थळांकडे ( Thane Tourism ) वळू लागली आहे. मागील गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या भितीमुळे हौशी पर्यटकांना मित्र, कुटूंबीय आणि नातेवाईकांसोबत पर्यटनास मूकावे लागले होते. आता मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ आणि नववर्ष स्वागताची भुरळ पर्यटनप्रेमींना पडू लागल्याने ठाणे, पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण करण्यात आल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ओमायक्रॉनचा फारसा परिणाम नाही ( Omicron Patients In Maharashtra ) -

ठाणे जिल्ह्यात २१ पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य रिसॉर्ट, पालघर जिल्ह्यातील वसई, डहाणू, जव्हार तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रेप पार्क, भंडारदरा, लोणावळा (कार्ला), माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे अशा प्रमुख ठिकाणी पर्यटकांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण झाले आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील खाजगी निसर्गरम्य परिसरात असलेल्या बहुतांश रिसॉर्टची बुकींग आदीच झाल्याने येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा नवा विषाणू म्हणजे ओमायक्रॉनची भिती आहे. मात्र शासनाने केलेल्या उपाययोजना व नव्या विषाणू ओमायक्रॉनचा फारसा परिणाम दिसत नसल्याने पर्यटनाकडील ओढा वाढू लागला आहे.

हे ही वाचा - महाबळेश्‍वर येथील नाताळावर कोरोन‍ाचे सावट, पर्यटकांनी केले बुकींग रद्द

महाबळेश्वरकडे पर्यटकांची पाठ, बुकींग होऊ लागली रद्द -

गेले दोन वर्षे अनिश्‍चिततेच्या गर्तेत अडकलेला महाबळेश्‍वर-पाचगणीचा नाताळचा पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच पर्यटकांनी महाबळेश्‍वरकडे ( Mahabaleshwar ) पाठ फिरवली आहे. त्यातही आता नव्या ओमायक्रॉनच्या ( Omicron ) घोंगावणाऱ्या संकटामुळे टाळेबंदी होईल या भितीने महाबळेश्‍वरची हॉटेल, रिसॉर्टमधील बुकींग रद्द होऊ लागली आहेत.

महाबळेश्वर येथे आढावा घेताना प्रतिनिधी

नाताळचा सिझनदिवाळी सुट्यांचा हंगाम संपला की पर्यटकांना नाताळचे वेध लागतात. महाबळेश्‍वरमध्ये तर पर्यटकांच्या दृष्टीने दिवाळी इतकेच नाताळचे आकर्षण असते. नाताळ साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक इयर एन्डची पार्टी साजरी करुनच नव्या वर्षाचे स्वागत करतात. पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी महाबळेश्‍वरच्या बाजार पेठेसह प्रमुख रस्ते, हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट सजलेले असतात.टाळेबंदी किंवा निर्बंधाची भितीगेले दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे महाबळेश्‍वरचा पर्यटन व्यवसाय अडचणीत होता. त्यातून कुठे उभारी घेत नाही तोच आता ओमायक्रॉनचा शिरकाव देशात झाल्याने अनामिक भितीचे सावट महाबळेश्‍वरच्या बाजार पेठेत पहायला मिळत आहे.

New Year Celebration : नववर्षस्वागत आणि नाताळ सुट्टीत पर्यटनस्थळांचे ९० टक्के आरक्षण

महाबळेश्‍वरच्या एमपीजी क्लबचे जनरल मॅनेजर अमीत नेगी म्हणाले, ‘‘पर्यटकांमध्ये ओमायक्रॉनची अनामिक भीती मनात आहे. यामुळे पुन्हा टाळेबंदी किंवा प्रशासनाची बंधने येतील, अशी शंका पर्यटकांच्या मनात पहायला मिळते. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा महाबळेश्‍वरचा नाताळचा हंगाम असतो. या सात दिवसांसाठीचे बुकींग साधारण 14-15 डिसेंबरपर्यंत महाबळेश्‍वरमध्ये फुल्ल होते. लॉजिंगला या काळात सर्वाधिक दर मिळतो. अधिक पैसे मोजूनही लोकांना लॉज उपलब्ध होत नाहीत, अशी सर्वसाधारण परिस्थिती असते.

मात्र महाबळेश्‍वरमध्ये आज क्षमतेच्या निम्मेही बुकींगही होऊ शकलेले नाही. उलट काही पर्यटकांनी बुकींग रद्द करायला सुरूवात केली आहे. ही परिस्थिती 20 तारखेपर्यंत सुधारेल, अशी अपेक्षा आहे. साधारण 10 टक्के बुकींग रद्द झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.