ETV Bharat / city

बीपीओ महिला कर्मचारी बलात्कार, खून प्रकरण : दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द - death penalty

आरोपीला शिक्षा देण्याच्या अंमलबजावणीत प्रदीर्घ वेळ लागल्याने न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Jul 29, 2019, 1:09 PM IST

Updated : Jul 30, 2019, 1:37 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणे शहरासह राज्याला हादरवून टाकणारी बीपीओ महिला कर्मचाऱ्याची खून व बलात्काराची घटना २००७ ला घडली होती. या प्रकरणामधील दोन्ही आरोपींच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

आरोपीला शिक्षा देण्याच्या अंमलबजावणीत प्रदीर्घ वेळ लागल्याने न्यायालयाने शिक्षा रद्द केली आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटे अशी दोषींची नावे आहेत.

काय खून व बलात्कार प्रकरण-

आरोपींनी बीपीओमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षी महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला होता. दोघे आरोपी बीपीओ कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत होते. पीडिता ही बहीण व नातेवाईकासोबत पुण्यात राहत होती.

१ नोव्हेंबर २००७ पासून पीडित तरुणी बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली. तेव्हा पीडितेचा मृतदेह सापडला होता. आरोपींचा खटला लढविणाऱ्या वकिलाकडे वकिलाची सनद नसल्याचेही तेव्हा आढळून आले होते. आरोपींनी पीडितेचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे खून झाल्यादिवशी तिच्या कामाचा शेवटचा दिवस होता. या खूनामुळे बीपीओ कर्मचाऱ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

Intro:Body:

Bombay High Court commutes death sentences of two convicts on the ground of unprecedented delay in execution, in rape and murder case of a BPO employee in Pune in 2007.

Conclusion:
Last Updated : Jul 30, 2019, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.