मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) गुरुवारी व्यावसायिक राज कुंद्रा ( Raj Kundra ) यांनी अश्लील व्हिडिओ वितरित केल्याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी कुंद्रा यांच्या अटकेपासून संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर बुधवारी निर्णय राखून ठेवला होता. खंडपीठाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shilpa Shetty ) पती कुंद्राविरुद्ध भारतीय दंड संहिता, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली अश्लील वितरण, प्रसारित केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
अटकेच्या भीतीने कुंद्राने प्रथम सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाची विनंती केली, परंतु ती फेटाळण्यात आली. त्यानंतर कुंद्रा यांनी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली. एफआयआरमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना सहआरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. कुंद्राच्या वकिलांनी असे सादर केले, की सहआरोपी म्हणून नाव असलेल्या अभिनेत्रींनी व्हिडिओ शूट करण्यास पूर्ण संमती दिली होती आणि कुंद्राचा या कथित बेकायदेशीर व्हिडिओच्या निर्मिती, प्रकाशन किंवा प्रसारणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नव्हता.
या वर्षी जुलैमध्ये, कुंद्राला मुंबई पोलिसांनी आणखी एका प्रकरणात अटक केली होती. जिथे त्याच्यावर अॅपद्वारे अश्लील चित्रपट प्रसारित केल्याचा आरोप होता. कुंद्राला सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता.
पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राने दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली - पॉर्नोग्राफी प्रकरण
पॉर्नोग्राफी प्रकरणी जामिनावर सुटलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra Case )याने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली. राजने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालाने ( Bombay HC ) अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे.