ETV Bharat / city

Bomb threat call मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी

author img

By

Published : Aug 23, 2022, 9:38 AM IST

Updated : Aug 23, 2022, 10:12 AM IST

मुंबई हॉटेल धमकी कॉल
मुंबई हॉटेल धमकी कॉल

09:34 August 23

मुंबई एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. ते निकामी करण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी आयपीसीच्या 336, 507 नुसार सहार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

ललित हॉटेलला बॉम्बने उडून देण्याची धमकी मुंबईमध्ये गेल्या महिन्याभरात अनेक प्रसिद्ध लोकांना तसेच मुंबईवर पुन्हा 26 11 सारख्या हल्ला करण्याचे फोन येत आहे. आज पुन्हा मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल पंचतारांकित ललित हॉटेलला बॉम्बने उडून देण्याची धमकी सायंकाळी 6 वाजता देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलची पाहणी केली असता बॉम्ब सापडलं नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच हा फोन फेक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले आणि ते बॉम्ब निकामी करण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आयपीसीच्या 336, 507 अन्वये सहार पोलिस स्थानकात गुन्हा करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुकेश अंबानी कुटुंबियांना धमकी या आधी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी देण्यात आली होती. त्यांना धमकीचे तीन- चार कॉल्स आले होते. पुढील 3 तासांत मोठी घटना घडेल असा दावा कॉल करणाऱ्याने केला होता. रिलायन्स फाउंडेशनच्या हरकिशनदास रुग्णालयातील नंबरवर धमकीचे फोन आले होते.

पाकिस्तान वरून धमकीचा फोन मुंबई ट्रॅफिक पोलीसला पाकिस्तान वरून धमकीचा फोन देत पुन्हा मुंबईमध्ये 26 11 सारखा हल्ला करणार असल्याची माहिती देण्यात आली होती त्यानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट मोडवर आले असता, सागरी तसेच मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. मात्र गेल्या एक महिन्यांमध्ये मुंबईमध्ये असे धमकीचे अनेक होऊन येत असल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे.

हेही वाचा Mumbai Govinda Death मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

Last Updated : Aug 23, 2022, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.