मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी तपास करत असताना यामध्ये आतापर्यंत अनेक अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील काही नामवंत कलाकारांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश अनिवासी भारतीय असलेल्या करण सजनानी या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या राहिला फर्निचरवालासह आणखीन एका महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींच्या चौकशीनंतर मुंबईतल्या सुप्रसिद्ध मुच्छड पानवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम कुमार तिवारी या आरोपीला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या मुच्छड पानवाला उर्फ राम कुमार तिवारी यास न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्यानंतर यासंदर्भात एनसीबीकडून अधिक तपास करत आहे.
बॉलिवूड ड्रग्स प्रकरण : करण सजनानी व मुच्छड पानवाला असे करायचे अमली पदार्थांची तस्करी - बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरण
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी सर्व आरोपींच्या चौकशीनंतर मुंबईतल्या सुप्रसिद्ध मुच्छड पानवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम कुमार तिवारी या आरोपीला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.