ETV Bharat / city

बीकेसी कोविड सेंटरमधील गलथान कारभार; मृतदेह दुसऱ्याच कुटुंबीयांच्या ताब्यात - बांद्रा बीकेसी जम्बो कोविड सेंटर

वांद्रे बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबीयांना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर या महिलेचा चार दिवस शोध घेतल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह इतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्याचे समोर आल्याने कोविड सेंटरमधील गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Apr 22, 2021, 9:04 PM IST

मुंबई - मुंबईतील सुप्रसिद्ध वांद्रे बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबीयांना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर या महिलेचा चार दिवस शोध घेतल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह इतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्याचे समोर आल्याने कोविड सेंटरमधील गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनाची लागण झाल्याने 67 वर्षीय संगीता सदानंद तनाळकर यांना 15 एप्रिलला बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. याच वेळी तिथे 72 वर्षीय रजनी परब यांना देखील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांना दाखल करताना कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी नावाची अदलाबदल केली. संगीता तनाळकर यांच्यावर कोविड सेंटरमध्ये रजनी परब यांच्या नावाने उपचार सुरू होते. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांची मुलगी वैशाली घोडके यांना संगीता यांची काहीच माहिती मिळत नव्हती.

४ दिवसानंतर मृत्यू झाल्याची माहिती

१८ एप्रिलला संगीता यांचा मृत्यू झाला. कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी संगीता यांचा मृतदेह परब कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. परब कुटुंबीयांनी रजनी परब यांचा मृतदेह समजून संगीता तरळकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्याच दिवशी परब कुटुंबीयांना रजनी परब या जिवंत असल्याची माहिती मिळाली. दुसरीकडे कनाळकर कुटुंब आणि त्यांची मुलगी वैशाली घोडके या बीकेसी सेंटरमध्ये आपल्या आईची विचारपूस डॉक्टरांकडे करीत होत्या. चार दिवस त्या कोविड केंद्रात पीपीई किट घालून आपल्या आईचा शोध घेत होत्या. चार दिवसांच्या शोधानंतर वैशाली घोडके यांना आपल्या आईचे निधन झाले असून दुसऱ्याच कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले.

कारवाईची मागणी

बीकेसी कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे संगीता तरळकर यांच्या मृतदेहावर त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करता आले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना सायन स्मशानभूमीत जाऊन अस्थी घ्याव्या लागल्या. तसेच रजनी परब यांच्या कुटुंबीयांनाही मनस्थाप सहन करावा लागला. या ढिसाळ कारभारामुळे दोन कुटुबांना त्रास सहन करावा लागल्याने या प्रकरणी बीकेसी कोविड सेंटरमधील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान बीकेसी कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.