ETV Bharat / city

ब्रिटीशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या बळकटीसाठी मुंबई पालिका करणार १०२ कोटीचा खर्च

मुंबईत ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. मुंबईचा विकास झपाट्याने होत असल्याने पायाभूत सुविधांचा ताण शहरांवर आला आहे. लोकसंख्याही वाढत असल्याने रस्ते, पाणी, मलनि:सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

BMC will spend Rs 102 crore for strengthening the British rainwater drainage line
ब्रिटीशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या बळकटीसाठी मुंबई पालिका करणार १०२ कोटीचा खर्च
author img

By

Published : Oct 16, 2021, 8:02 PM IST

मुंबई - शहरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्या आहेत. यापैकी अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जुन्या ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्याचे (आर्च ड्रेन) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर कोणतेही खोदकाम न करता चरविरहित तंत्रज्ञान या कामासाठी वापरले जाणार आहे. या कामासाठी पालिका १०२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा -

मुंबईत ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. मुंबईचा विकास झपाट्याने होत असल्याने पायाभूत सुविधांचा ताण शहरांवर आला आहे. लोकसंख्याही वाढत असल्याने रस्ते, पाणी, मलनि:सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या १५ -१६ वर्षात ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवले जाते आहे. या बरोबर ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सुधारून त्याचे आयुर्मान वाढवण्यात येणार आहे. शहर भागात कुलाबा ते सायनदरम्यान २२ ठिकाणी हे काम केले जाणार आहे. ड्रेनची बहुसंख्य बांधकामे विटांची आहेत. काही बांधकामे आतून खचण्याची शक्यता असते. आतील भिंतींचे प्लास्टर निखळलेले असते. त्यामुळे त्याचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या ड्रेनमधून पाण्याचा मोठा प्रवाह असतो. ड्रेन कमकुवत झाल्यास पाणी भूगर्भात शिरण्याची किंवा इतर मार्गाने बाहेर येण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन या कामाव्दारे उपाययोजना केल्या जाणार आहेत. अशी माहिती पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्याने दिली.

वाहनातून मारणार सिमेंट काँक्रीटचे फवारे -

मुंबईतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असल्याने ड्रेनची सुधारणा रस्ते खोदून करणे शक्य होत नाही. त्यामुळे भूमिगत कामे करावी लागतात. ड्रेनमध्ये काही ठिकाणी मलनि:सारणवाहिन्या तसेच काही ठिकाणी समुद्राचे पाणी शिरलेले असते. ते काम करण्याआधी पूर्ण बाहेर काढले जाते. कमी मनुष्यबळाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. ड्रेनमध्ये कामगार, कर्मचारी आत पाठवताना आधी ड्रेनमधील विषारी वायू व विविध प्रकारचे गॅस तंत्रज्ञानाचा वापर करून बाहेर काढावा लागतो. वाहनातून सिमेंट काँक्रीटचे फवारे मारून ड्रेनमधील भिंतींना गिलावा दिला जातो. त्यावर आणखी काही थर देऊन हे ड्रेन अधिकाधिक मजबूत केला जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - अर्धे काय पूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही कुणाला घाबरणार नाही! - मंत्री नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.