मुंबई : पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने ‘एस’ विभागात विक्रोळी पश्चिम परिसरात डोंगर उतारावर राहणा-या रहिवाशांना पालिकेने धोक्याचा इशारा दिला ( Danger warning from BMC ) आहे. रहिवाशांनी पावसापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. याबाबत स्थलांतराची नोटीसही ( Of migration...) दिली जाते. यंदाही विक्रोळी व भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षितस्थळी स्थलांतर व्हा! पालिकेचा इशारा : मुंबईत डोंगर उतारावर राहणा-यांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. पावसाळ्यादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरून वाहत येणा-या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचा धोका असतो. त्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना पालिकेने सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना या पूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असेही एस विभागाच्या सहायक आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.
येथील झोपड्यांना धोक्याचा इशारा : सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीमनगर, गौतमगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकरनगर भाग १ व २, नरदासनगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमाननगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या, डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपड्या.
हेही वाचा : Minister Aditya Thackeray : '...तर मुंबईत किमान गुडघ्यापर्यंत पाणी साचु शकते'