ETV Bharat / city

Yashwant Jadahv Corona Positive : मंत्रालयानंतर मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाचा प्रवेश; स्थायी समिती अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह - मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्रकृती ( Yashawant Jadhav tested Corona Positive ) खालावली होती. त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. ताप आल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्यांचा ( BMC Standing Committee Chairperson ) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यशवंत जाधव
यशवंत जाधव
author img

By

Published : Jan 5, 2022, 9:02 PM IST

मुंबई - विधानभवन, मंत्रालयानंतर कोरोनाचा मुंबई महापालिका मुख्यालयात प्रवेश झाला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( BMC Standing Committee Chairperson ) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मुंबईत नुकतेच विधीमंडळ अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी व पत्रकार यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तसेच अधिवेशनानंतरही मंत्री, आमदार व खासदार यांनी कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचणीदरम्यान अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विधानभवन व मंत्रालय आदी ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तरी मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाचा प्रसार झाला नव्हता. पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्रकृती ( Yashawant Jadhav tested Corona Positive ) खालावली होती. त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. ताप आल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्लाने यशवंत जाधव हे रुग्णालयात भरती झाले आहे.

हेही वाचा-Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

कोण आहेत यशवंत जाधव- ( BMC Standing Committee Chairperson Profile )
यशवंत जाधव हे गेले पंधरा वर्षे पालिकेत नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये निवडून आल्यावर त्यांना महापौर पदासाठी डावलण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सभागृह नेते बनविण्यात आले. चार वर्षांपूर्वी त्यांची स्थायी समिती अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाली. तेव्हापासून पालिकेतील कोणतेही शिवसेनेचे निर्णय जाधव यांना विचारल्याशिवाय घेतले जात नाहीत. जाधव हे गेले चार वर्षे पालिकेत शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. पालिकेच्या तिजोरीची चावी गेली चार वर्षे यशवंत जाधव यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या विभागातील आमदार ( Shivsena leader Yashwant Jadhav wife ) आहेत.

हेही वाचा-Cryptocurrency Mining Banned : खर्च १४ हजार, नफा २ लाखांचा.. क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगला 'या' देशात बंदी..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.