मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण गेल्या काही दिवसांत वाढू लागले आहेत. त्यातच ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून ( Omycron patients in Maharashtra ) आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाताळ सण, थर्टी फर्स्टचे होणारे कार्यक्रम ( Rule for christmas in Mumbai ) यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे.
सभागृह अथवा खुल्या जागेत २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील तर आयोजकांना महापालिकेची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. तसे आदेश ( Mumbai Municipal Corporation rule ) मंगळवारी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
कार्यक्रमांना परवानगी घ्यावी लागणार -
जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे. त्यात सध्या सार्वजिनक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ( Rule for 31st Dec 2021 in Mumbai ) पालिका आयुक्तांनी मंगळवारी नवीन नियम जारी केले आहेत.
पालिकेचे पथक तपासणी करणार -
राज्य सरकारच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्णयानुसार १ हजार पेक्षा जास्त व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असतील तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार होती. तर, आता नव्या आदेशानुसार कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार असल्यास स्थानिक प्रभाग कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच ही परवानगी दिल्यानंतर पालिकेचे पथक स्वता जाऊन तपासणी करेल, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के आणि खुल्या जागेत २५ टक्के व्यक्तींना कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याची परवानगी असणार आहे.
हेही वाचा-राज्यात ओमायक्रॉनचे 11 नवे रुग्ण, यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश
काय आहेत नियम -
- बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के
- खुल्या जागेत २५ टक्के
- २०० पेक्षा अधिक लोक असल्यास पालिकेची परवानगी घ्यावी लागणार