ETV Bharat / city

पाच महिन्यात ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले, मुंबई महापालिकेचा दावा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ९ एप्रिल ते दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत पालिका हद्दीतील रस्त्यांवरील ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते, असा दावा महापालिकेने केला आहे.

न
author img

By

Published : Sep 11, 2021, 10:43 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने ९ एप्रिल ते दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत पालिका हद्दीतील रस्त्यांवरील ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते, असा दावा महापालिकेने केला आहे. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरु झाली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

खड्डे बुजवायला कोल्ड मिक्स

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी येथील अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.

दोन वर्षांचे कंत्राट

रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा काढून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केले आहेत. हे कंत्राट दोन वर्षाचे आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत. याशिवाय, प्रकल्प रस्ते व हमी कालावधीत असलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे कंत्राटदाराकडून विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला दिला जात नाही.

२ हजार ६९६ मेट्रिक टन कोल्ड मिक्सचा वापर

महानगरपालिकेतर्फे ९ एप्रिल, २०२१ ते दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेच्या अस्फाल्ट प्लांट मार्फत २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना एकूण २ हजार ६९६ मेट्रिक टन म्हणजेच १ लाख ७ हजार ८४३ बॅग वितरित करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध महानगरपालिकेच्या नियमित कामगारामार्फत २२ हजार ८९७ खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ ४९ हजार ९१९ चौरस मीटर आहे. खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ८ हजार ५०१ खड्डे बुजविण्यात आले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ६ हजार ९८५ चौरस मीटर आहे.

रस्त्यांचे काँक्रीटीकरण

डांबराचे रस्ते म्हणजेच अस्फाल्ट रोड मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी, यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या कमी होणार आहे.

हेही वाचा - CORONA VIRUS : राज्यात शनिवारी ३,०७५ नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.05 टक्क्यांवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.