ETV Bharat / city

मुंबईत पावसाळी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट, यंदा एकच मृत्यू

author img

By

Published : Sep 4, 2021, 6:50 AM IST

मुंबईमध्ये पावसाळ्यादरम्यान मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हेपाटिटिस, एच १ एन १ या आजरांचे प्रमाण वाढते. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्याच्या कालावधीत लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षाची आकडेवारी पाहिल्यास मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

पावसाळी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. या आजारांच्या रुग्णसंख्येत दरवर्षी चढउतार पाहायला मिळतो. मात्र या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गेल्या दोन वर्षात कमी झाले आहे. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत लेप्टोमुळे एकाच मृत्यूची नोंद झालेली आहे. इतर आजारांमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याने कोरोनाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना किंचितसा दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -

मुंबईमध्ये पावसाळ्यादरम्यान मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हेपाटिटिस, एच-१ एन-१ या आजरांचे प्रमाण वाढते. २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७, लेप्टोचे २८१, डेंग्यूचे ९२०, गॅस्ट्रोचे ७७८५, हेपॅटिटीसचे १५३४, एच १ एन १- ४५१ रुग्ण आढळून आले होते. तर याच वर्षात लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ जणांचा बळी गेला आहे. २०२० मध्ये मलेरियाचे ५००७, लेप्टोचे २४०, डेंग्यूचे १२९, गॅस्ट्रोचे २५४९, हेपॅटिटीसचे २६३, एच १ एन १ चे ४४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत मलेरियाचे ३३३८, लेप्टोचे १३०, डेंग्यूचे २०९, गॅस्ट्रोचे १८४८, हेपॅटिटीसचे १६५, एच १ एन १ चे ४५ रुग्ण आढळून आले आहेत. तर केवळ एकाचा मृत्यू झाला.

मृत्यू संख्येत घट-

मुंबईमध्ये पावसाळ्यादरम्यान मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हेपाटिटिस, एच १ एन १ या आजरांचे प्रमाण वाढते. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्याच्या कालावधीत लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षाची आकडेवारी पाहिल्यास मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. म्हणजेच यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्याच्या कालावधीत लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षाची आकडेवारी पाहिल्यास मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

महिनाभरात डेंग्यूचे रुग्ण चार पटीने वाढले -

मुंबईत जुलै २०२१ मध्ये डेंग्यूचे २८ रुग्ण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन १३२ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात चार पटीहून अधिक वाढ झाली आहे. जुलै महिन्यात मलेरियाचे ७८७ रुग्ण आढळून आले, ऑगस्ट महिन्यात ७९० रुग्ण आढळून आले आहेत. गॅस्ट्रोचे जुलै महिन्यात २९४ तर ऑगस्ट महिन्यात २७६, लेप्टोचे जुलैमध्ये ३७ तर ऑगस्टमध्ये ३७, हेपेटायटीसचे जुलैमध्ये ४८ तर ऑगस्टमध्ये ३५, एच १ एन १ चे जुलैमध्ये २१ तर ऑगस्टमध्ये १७ रुग्ण आढळून आले आहेत.

खबरदारी घ्या -

दरम्यान यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. साधारण पाऊस कमी झाला की ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसमोर साथीच्या आजारांचे नवीन आव्हान असणार आहे. दरम्यान घरात आणि आजुबाजूच्या परिसरात मलेरिया आणि डेंग्यूचे डास होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पालिका सज्ज -
पावसाळी आजारांसाठी पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांसह कस्तुरबासह सर्व १६ उपनगरीय रुग्णालये व इतर रुग्णालयांत पावसाळी आजारांसाठी बेड उपलब्ध आहेत. गंभीर आजारी रुग्णांसाठीही आवश्यक असणारी सर्व औषधे पालिकेकडे उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालय, घरोघरी आणि रॅपिड टेस्टच्या माध्यमातून चाचण्याही केल्या जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.