मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये, यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना ( BMC measures for corona patients beds ) करण्यास सुरुवात केली आहे. सर्व खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होममधील 80 टक्के खाटा 11 जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात द्या, असे आदेश पालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत.
मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढली आहे. 21 डिसेंबरपासून ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण इमारतीमधून आढळून येत आहेत. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी 10 ते 12 टक्के रुग्ण लक्षणे असलेले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचा ( Beds for corona patients in Mumbai ) निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या लाटेदरम्यान 5 मे 2021 रोजी प्रमाणे 11 जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात खाटा देण्याच्या ( BMC Preparation For Third Wave ) सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ( Suresh Kakani order on beds for patients ) दिले आहेत.
हेही वाचा-Warrant Against Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
काय दिले आहेत आदेश -
- खासगी रुग्णालये, नर्सिंग होममधील 80 टक्के खाटा आणि 100 टक्के आयसीयू खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात.
- खाटावर कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या सल्ल्यानुसार भरती करावे.
- राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णांकडून बिल घ्यावे.
- सर्व रुग्णालयांनी लागणारी औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क, उपकरणे यासह सज्ज राहावे असे आदेश देण्यात आले आहेत.
.