ETV Bharat / city

18 वर्षावरील लाभार्थ्यांना पैसे घेऊन लस, ही तर मुंबईकरांची फसवणूक - भाजपा

खासगी रुग्णालयात एका लसीच्या डोससाठी 250 रुपये खर्च येतो. एका व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागतात. यामुळे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी 500 रुपये खर्च येणार आहे. याला भाजपाने विरोध केला आहे.

 तर मुंबईकरांची फसवणूक
तर मुंबईकरांची फसवणूक
author img

By

Published : Apr 28, 2021, 12:27 PM IST

मुंबई - 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील नागरिकांना खासगी रुग्णालयात लस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण केले जाते. यामुळे या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका नागरिकांची फसवणूक करतेय, अशी टीका भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

या संदर्भात शिंदे यांनी "ई टीव्ही भारत"शी मोबाईलद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विचऑफ असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.

भाजपाची टीका -

1 मे पासून देशभरात 18 ते 45 वर्षामधील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार आहे. हे लसीकरण खासगी रुग्णालयातच केले जाईल, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. खासगी रुग्णालयात एका लसीच्या डोससाठी 250 रुपये खर्च येतो. एका व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागतात. यामुळे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी 500 रुपये खर्च येणार आहे. याला भाजपाने विरोध केला आहे.

'सोमवारी आम्हाला मोफत लस देऊ असे सांगण्यात आले आणि आज खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण केले जाईल, असे सांगितले जात आहे. ही राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांची फसवणूक आहे. त्यांच काय चालले आहे, हे त्यांनाच माहीत नाही', अशी टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

पालिका आयुक्तांचा आदेश -

देशातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवार, दिनांक १ मे, २०२१ पासून सुरू होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महापालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण ६३ केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे ४५ वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे. १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सरकारच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही -

यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल, असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.