ETV Bharat / city

बेवारस सहा हजार वाहनांना पालिकेची नोटिस, जप्तीसह लिलाव होणार - बेवारस सहा हजार वाहनांना पालिकेची नोटिस

मुंबईत रस्त्यावर आपली वाहने बेवारस सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा सुमारे सहा हजार वाहनांच्या मालकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. ही वाहने हटविण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

unclaimed vehicles
बेवारस वाहने
author img

By

Published : May 5, 2022, 7:59 PM IST

मुंबई - मुंबईत रस्त्यावर आपली वाहने बेवारस सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा सुमारे सहा हजार वाहनांच्या मालकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. ही वाहने हटविण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत बेवारस वाहने हटवली नाही तर ती जप्त करून त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. पालिकेच्या बी वॉर्ड येथून प्रायोगिक उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

बेवारस वाहनांची समस्या - मुंबईत अनेक अरुंद रस्ते आहेत. नागरिकही आपली वाहने रस्त्यावर पार्किंग करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. रस्त्याच्या कडेला, पुलाखाली वाहने सोडून दिली जातात. त्यामुळे पालिकेकडून बेवारस वाहने टोईंग करून वॉर्डमधील गोडाऊनमध्ये ठेवली जातात. या कार्यवाहीमध्ये अनेक वेळा वाहनांच्या मालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व बेवारस गाड्यांची माहिती एक क्लिकवर मिळवण्यासाठी अत्याधुनिक ऍप विकसित करण्यात येणार आहे. या ऍपमुळे वॉर्डात किती बेवारस वाहने आहेत, वाहन कुठे आहे, कोणत्या प्रकारचे वाहन आहे, वाहनाचा नंबर काय आहे अशी सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

प्रायोगिक तत्वावर सुरुवात - बेवारस वाहने पालिकेचा गोडाऊनमध्ये ठेवली जातात. बेवारस वाहनांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या गोडाऊनमधील जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी कांजूरमार्ग येथे 700 बेवारस वाहने ठेवता येतील अशी जागा पालिकेने निश्चित केली आहे. माहुल मध्येही जागेचा शोध सुरू आहे. जप्त केलेल्या 3 हजार वाहनाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असून 6 हजार वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. या गाड्यांचा पुढील दोन महिन्यात लिलाव केला जाणार आहे. पालिकेच्या बी वॉर्ड संडहर्स्ट रोड येथून या उपक्रमाला प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.