ETV Bharat / city

मिठी नदी होणार प्रदूषण मुक्त, पालिका करणार ५६९ कोटी रुपये खर्च - साडपाणी व्यवस्थापन मिठी नदी

मुंबई महापालिकेने मिठी नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका ५६९ कोटी रुपये खर्च करणार आहे. नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम टप्प्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. तर रुंदीकरणाचे कामही चार टप्प्यांमध्ये होणार आहे.

मिठी नदी होणार प्रदूषण मुक्त
मिठी नदी होणार प्रदूषण मुक्त
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:49 PM IST

मुंबई - २६ जुलै २००५ च्या जलप्रलयावेळी मुंबईत रौद्र रूप धारण करणाऱ्या मिठी नदीचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. आता या नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मिठी नदीच्या पात्रात जाणारे सांडपाणी व मैलापाणी अडवत नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पालिका ५६९ कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या लवकरच कामाला सुरुवात होणार मिठी नदी प्रदूषित मुक्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याचे पर्जन्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

५६९ कोटी खर्च करणार -

२००७ पासून मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सुरू आहे. नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून नदीत येणारे सांडपाणी अडविण्याचे काम सुरू आहे. मात्र १३ वर्षांपासून हे काम सुरू असून आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्याप संपलेले नाही. आता, पवई फिल्टर पाडा ते बांद्रे कुर्ला संकुलातील एमटीएनएल कार्यालयापर्यंत नदीचे रुंदीकरण, खोली करण, बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच नदीच्या बाजूने सेवा रस्ते बांधून नदीत येणारे सांडपाणी आणि मैलापाणी अडविण्यासाठी वाहीन्या टाकण्यात येणार आहे. दरम्यान, आता काही भागातील नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी महानगर पालिका ५६९ कोटी ५२ लाख रुपये खर्च करणार आहे. पुढील दोन वर्षात हे काम पुर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रस्ताव मंजूर -

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम टप्प्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. तर रुंदीकरणाचे कामही चार टप्प्यांमध्ये होत आहे. यात, विनामतळ टॅक्सीवे पूल, कुर्ला ते अशोक नगर अंधेरी पूर्व किनारा, विमानतळ टॅक्सी वे पूल कुर्ला ते अशोक नगर पश्‍चिम किनारा, वांद्रे कुर्ला संकुल एमटीएनएल ते विमानतळ टॅक्सी वे पूल कुर्ला, अशोक नगर अंधेरी ते पवई फिल्टरपाडा या टप्प्यांमध्ये काम होणार आहे. महापालिकेने हे प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात बैठकीत मांडले होते. मात्र, स्थायी समितीने तेव्हा हे प्रस्ताव फेटाळले होते. बुधवारी झालेल्या बैठकीत पुन्हा प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात आला असता मंजूर करण्यात आला.

अशी झाली खर्चात वाढ -

  • विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर अंधेर (पूर्व किनारा ) पालिकेचे अंदाजित खर्च ६३ कोटी ४३ लाख ३५ हजार ४६६, प्रत्यक्ष खर्च ७५ कोटी ८९ लाख ३० हजार ८८१ ,
  • विमनातळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर अंधेर( पश्‍चिम किनारा ) पालिकेचे अंदाजित खर्च ७१ कोटी १७ लाख , प्रत्यक्ष खर्च ९६ कोटी ९५ लाख ४९ हजार ५५६
  • एमटीएनएल बीकेसी ते विमानतळ टॅक्सीवे पुल कुर्ला - पालिकेचा अंदाजित खर्च ११३ कोटी १८ लाख २३ हजार ६८५ खर्च करण्यात येणार आहे.

    रोज १० लाखाचा दंड -

मिठी नदीचे प्रदुषण रोखण्यात महानगर पालिकेला अपयश आलेले असल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने महापालिकेला रोज १० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे काम नियोजीत वेळेत पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये नमुद केले आहे. यात नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्या बरोबरच नदीत येणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. तसेच,हे मैला आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या बाजुने वाहिनी तयार करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.